पियाँगयान : नववर्षानिमित्त करण्यात आलेल्या भाषणादरम्यान किम जोंगने ही धमकी दिलीय. अमेरिकेची संपूर्ण जमीन उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्राच्या टप्प्यात येते आणि याचं बटण नेहमीच आपल्या हातात असतं असं त्यानं म्हटलं. ही धमकी नसून वास्तव असल्याचे किम जोंग उनने सांगितलंय. 


नवीन क्षेपणास्त्राच्या चाचणीचे धाडस


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिका कधीही उत्तर कोरिया किंवा आपल्यासह लढणार नाही, असा विश्वासही त्याने व्यक्त केलाय. वा-साँग-15’ या नवीन क्षेपणास्त्राच्या चाचणीने उत्तर कोरियाचे हे धाडस हा जगाच्या दृष्टीने धोकादायक असल्याच्या प्रतिक्रिया जगभरातून उमटल्यात. 


चार हजार 474 किलोमीटर उंचीवर पोहोचल्यानंतर हे क्षेपणास्त्र चाचणी स्थळापासून साडेनऊशे किलोमीटर जपानजवळ समुद्रात पडले. 


आण्विक क्षेपणास्त्र लॉन्च करण्यात सक्षम


या चाचणीवर अमेरिका, रशिया, चीन, दक्षिण कोरिया, जपान आणि संयुक्त राष्ट्रानंही चिंता व्यक्त केली होती. उत्तर कोरिया 2018 पर्यंत आण्विक क्षेपणास्त्र लॉन्च करण्यात सक्षम होईल दक्षिण कोरियानं म्हटलं होतं.