नवी दिल्ली : भारतीय विद्यार्थ्यांवर इटलीमध्ये हल्ल्याची घटना समोर आली आहे. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी विद्यार्थ्यांना ट्विट करुन सांगितलं आहे की, चिंता नका करु, प्रकरणावर आम्ही लक्ष ठेऊन आहोत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भारतीय दूतावासाने सोमवारी भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ल्य़ाच्या प्रकरणावर एक एडवायजरी सादर केली होती. विद्यार्थ्यांना घाबरुन न जाण्याचं आवाहन केलं होतं.


मिलानमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर हल्ल्याची माहिती मिळाली होती. आम्ही विद्यार्थ्यांना आवाहन करतो की त्यांनी घाबरुन जाऊ नये. आम्ही प्रकरणाला कायदा व सुव्यवस्थेच्या उच्च स्तरापर्यंत घेऊन जाऊ.


विद्यार्थ्यांना हे देखील सांगण्यात आलं आहे की, त्यांनी एकमेकांच्या संपर्कात राहवे. खास करुन ते जेव्हा बाहेर पडतील. विद्यार्थ्यांना अशा भागात पण न जाण्यास सांगितलं आहे जेथे त्यांच्यावर हल्ले होऊ शकतात.