Imran Khan Firing : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी येतेय भारताचा शेजारी पाकिस्तानमधून. पाकिस्तानमध्ये सर्व काही सुरळीत ( Firing In Pakistan ) सुरु नाही  हे यावरून अधोरेखित होतंय. पाकिस्तानच्या वझीराबादमध्ये गोळीबार ( Wazirabad Shooting)  झाल्याची घटना घडली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर हा गोळीबार झाल्याची बातमी समोर येते आहे. इम्रान खान यांच्या 'आझादी मार्च' रॅलीमध्ये गोळीबार ( Imran Khan Azadi March ) करण्यात आला. स्वतः इम्रान खान ज्या कंटेनरमध्ये होते त्याच्या जवळच हा गोळीबार झाल्याचं समोर येतंय. या गोळीबारात स्वतः इम्रान खान आणि सोबतच आणखी काही कार्यकर्ते जखमी झाल्याचं समोर येतंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार गोळीबार करणाऱ्याला एकाला अटक करण्यात आलेली आहे. इम्रान खान आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करणारच होते. दरम्यान त्याच वेळेस हा गोळीबार झाल्याचं समोर येत आहे. इम्रान खान यांनी पाकिस्तान आर्मी, पाकिस्तानातील ISI आणि तिथल्या राजकीय पक्षांवर हल्लाबोल केलेला. यानंतर आता त्यांच्यावर हल्ला झाल्याचं समोर आलं आहे. 


व्हिडीओ पाहा : 



attack on pakistan ex PM imran khan at wazirabad during aazadi march