ऑस्ट्रेलिया : एकीकडे भारतातील लोक पारंपारिक वस्तू सोडून हायटेक उत्पादनांच्या मागे धावत आहेत. तर दुसरीकडे इतर विकसीत देश भारतीय पारंपारिक वस्तू स्विकारत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचं एक ताजं उदाहरण म्हणजे भारतातील चारपाई म्हणजेच खाटेला ऑस्ट्रेलियात जोरदार मागणी वाढली आहे. 


ऑस्ट्रेलियात नारळाच्या दोरीपासून आणि लाकडाच्या फ्रेमपासून तयार करण्यात आलेल्या खाटेची जाहिरात चांगलीच गाजत आहे. ऑस्ट्रेलियातील या जाहिरातीने भारतीय ट्विटर यूजर्सना आश्चर्याचा धक्काच दिला आहे. हा धक्का खाटेला तिथे मागणी वाढल्यामुळे नाही तर खाटेची किंमत पाहून बसला आहे. 


या जाहिरातीत एका खाटेची किंमत ९०९ डॉलर इतकी देण्यात आली आहे. म्हणजेच भारतीय करन्सीमध्ये ही किंमत ५० हजार रूपये इतकी आहे. या जाहिरातीत खाटेला पारंपारिक भारतीय डे-बेड सांगण्यात आलं आहे. आणि हा बेड अतिशय आरामदायक असल्याचा दावाही करण्यात आलाय. ही खाट शंभर टक्के ऑस्ट्रेलियात तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. 




ही जाहिरात पाहून ट्विटरवर खूप गमतीदार प्रतिक्रिया येत आहेत. काही लोक खाटेच्या किंमतीवरून कमेंट करत आहेत. तर काही लोक गंमत करत आहेत.