कोरोनानं हिरावलं राहतं घर; बसमध्ये संसार थाटत सुरु केला नवा प्रवास
जग दोघांचे असे रचू की, स्वर्ग त्यापुढे फिका पडे......पत्नी गर्भवती कोरोना काळात हातातून घर गेलं, आता बसमधील संसारात असं करणार बाळाचं स्वागत
मेक्सिको: प्रत्येक कपलला आपलं सुंदर घर असावं आणि आपण ते सजवावं असं स्वप्न असतं. पण कोरोना काळात आपलं राहतं घर सोडण्याची वेळ एका कपलवर आली आहे. आपलं घर सोडून कोणी गाडीत 24 तास राहण्याचा विचार करू शकतं का? तर नक्कीच नाही. पण एका कपलवर ही वेळ आली आहे. आपलं घर सोडून बसमध्ये राहण्याची वेळ या कपलवर आली आहे.
एका कपलने राहता प्लॅट सोडला आणि आता एका बसमध्ये आपलं घर तयार केलं आहे. या बसमध्ये आता ते येणाऱ्या गोंडस बाळासाठी तयारी करत आहेत. या कपलची स्टोरी सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. ऑस्ट्रेलियाच्या न्यूकॅसल इथल्या लॉरी ब्राउन आणि तिचा पती ख्रिस 7 वर्षांपूर्वी टिंडर ड़ेटिंग अॅपवर एकमेकांना भेटले.
ते आपल्या घराचा रेंट 800 पाऊंड देत होते. त्यावेळी त्यांनी आपलं एक छोटं घर घेण्याचा निर्णय घेतला. दोघंही एकत्र आल्यापासून एका छोट्या घराचं स्वप्न साकार करण्यासाठी प्रयत्न करत होते. 2020 मध्ये कोरोनाचा संसर्ग वाढला. त्यावेळी या दोघांनीही एक विंटेज बस खरेदी केली. 5500 पाऊंड खर्च करून त्यांनी ही बस घेतली जी दोघांनाही पाहताच क्षणी आवडली होती.
या बसला त्यांनी रिनोव्हेट केलं आणि या बसमध्ये घर तयार केलं. यासाठी त्यांना साधारण 18 महिन्यांचा कालावधी लागला. या बसमध्ये आता लॉरी तिचा पती आणि दोन छोटे कुत्रे राहतात. आता लवकरच त्यांच्या घरात नवीन पाहुणा येणार आहे. त्याच्या स्वागताची तयारी सुरू आहे.
लॉरी प्रेग्नंट असून ती आपल्या या गोंडस बाळाचं स्वागत या नव्या घरात करण्यासाठी फार उत्सुक आहे. लॉरी म्हणते की मी या दिवसाची खूप आतुरतेनं वाट पाहते आहे ज्या दिवशी आम्ही 5 जण मिळून एकाच या बसमधून वेगवेगळ्या शहरात प्रवास करू.