ऑस्ट्रेलिया : आठ तास काम आणि आठवड्यात एक सुट्टी घेतली की त्यानंतर महिन्याच्या शेवटी आपला पगार होतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्यामध्येही लेट मार्क झाल्यास अनेकांचा पगार कापलाही जातो. 


मुंबई,पुणे,दिल्ली सारख्या मेट्रो शहरांमध्ये तीव्र स्पर्धेच्या जोडीने ट्राफिक, धक्काबुक्की अशा अनेक अडथळांना पार करून लोकं कामावर जातात आणि मन असो वा नसो पोटासाठी काम करत राहतात. पण ऑस्ट्रेलियामध्ये चेल्सिया ही मुलगी केवळ तासभर गेम खेळून तब्बल ९ लाख रूपये कमावते. 


ऑस्ट्रेलियामध्ये ऑनलाईन गेम ही फार मोठी इंडस्ट्री आहे. अनेक  गेम्समधील दोष शोधणे हे काम चेल्सिया करते. लहानपणापासूनच चेल्सियाला ऑनलाईन खेळांची आवड आहे. त्यामुळे यामध्येच पुढील करिअर करण्याचा चेल्सियाने निर्णय घेतला. त्यानुसार अनेक ऑनलाईन गेम्स टेस्टिंग स्तरावर चेल्सिया खेळते. कंपनींना त्यामधील दोष सांगते. 


ऑनलाईन गेम्समधील दोष पाहणं आणि ते सुचवणं हे काम चेल्सिया इतक्या सहज पद्धतीने करते की अनेकजण केवळ तिला खेळ खेळताना पाहण्यासाठी येतात. चेल्सियाला पाहण्यासाठीदेखील अनेक ऑफिसमध्ये गर्दी असते. 
खेळातील दोष सांगण्याचे पैसे चेल्सिया घेते पण त्यासोबतच तिच्या या कामाचे ऑनलाईन स्ट्रिमिंगदेखील केले जाते. त्याचे सबस्क्रिप्शन,अ‍ॅड्स यामधूनही चेल्सियाची कमाई होते.