ऑस्ट्रेलियात सापडलेल्या रहस्यमयी तुकड्यांबाबत धक्कादायक खुलासा; भारताच्या `चांद्रयान 3` सोबत कनेक्शन
इस्रोकडून चांद्रयान 3 चं यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर रहस्यमयी वस्ती सापडल्या होत्या. याचा खुलासा अखेर झाला आहे.
Chandrayaan 3 : 'चांद्रयान 3' चा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. 14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावल आहे. चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणानंतर सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत आहेत. चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणानंतर काही दिवसांतच ऑस्ट्रेलियातील समुद्र किनाऱ्यावर रहस्यमयी वस्तु आढळून आल्या होत्या. या वस्तु 'चांद्रयान 3' शी संबधीत असल्याचा दावा करण्यात आला होता. यामुळे याची जोरदार चर्चा सुरु होती. अखेरीस 14 दिवसानंतर याचा खुलासा झाला आहे. या रहस्यमयी वस्तु भारतीय रॉकेटच्या असल्याचा खुलासा झाला आहे. तपासादरम्यान जगभरातील अंतराळ संस्थांशी संपर्क साधण्यात आला होता.
ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर भारताच्या 'चांद्रयान 3'चे अवशेष सापडल्याची चर्चा
14 जुलै 2023 रोजी चांद्रयान 3 चंद्राकडे झेपावले. यानंतर काही दिवसातच ऑस्ट्रेलियातील समुद्र किनाऱ्यांवर रॉकेटचे अवशेष आढळून आले होते. हे अवशेष चांद्रयान 3 चे असल्याचा दावा करण्यात आला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. साधारण दोन मीटर वर्तुळाकार आकाराची धातूची वस्तू होती. ही वस्तू पाहताना ऑस्ट्रेलियातील पोलिसही अचंबित झाले होते. ही वस्तू ताब्यात घेत तपासणीसाठी पाठवण्यात आली होती. ऑस्ट्रेलियातील अंतराळ संशोधन संस्थेनं याचा तपास सुरु केला होता. यासाठी जगभरातील अंतराळ संस्थांशी संपर्क साधण्यात आला होता. यानंतर ही धातूची वर्तुळाकार आकाराची वस्तू म्हणजे भारतीय रॉकेटचे अवशेष असल्याचा खुलासा झाला आहे.
या रॉकेटचा Chandrayaan 3 सोबत संबध
तपासादरम्यान हे भारतीय रॉकेटचे अवशेष असल्याचा खुलासा झाला आहे. PSLV रॉकेटच्या माध्यमातून चांद्रयान 3 चे अवकाशात प्रक्षेपण करण्यात आले. जेव्हा एखादं रॉकेट लाँच केले जाते तेव्हा ते विविध टप्प्यांतून पुढे जाते. रॉकेट जसजसं उंचावर जाते लागतं तसतसं त्याचं वजन आणखी हलकं करण्याच्या हेतूनं त्याचे काही भाग वेगळे होतात. रॉकेटचे अवशेष दोन प्राथमिक टप्प्यांमध्ये प्रक्षेपणाच्या ठिकाणापासून दूर असणाऱ्या एखाद्या समुद्रात पडतात. अशाच प्रकारे चंद्रयान 3 चे प्रक्षेपण करणाऱ्या PSLV रॉकेटचे काही अवशेष हे ऑस्ट्रेलियाच्या समुद्र किनाऱ्यावर पडले होते.
भारताच्या Chandrayaan 3 मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष
भारताच्या Chandrayaan 3 मोहिमेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. 42 दिवसांच्या प्रवासानंतर चांद्रयान 3 चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे.