सिडनी : चीनच्या (China) दादागिरीमुळे मोठे युद्ध होण्याची भीती निर्माण झाली आहे. चीनसोबत युद्ध होऊ शकते हे ऑस्ट्रेलियाने (Australia) मान्य केले आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री पीटर डटन (Peter Dutton) म्हणाले की, चीन ज्या प्रकारचा दृष्टिकोन अवलंबत आहे. त्यामुळे युद्धाची भीती अधिक गडद झाली आहे. चीन या युद्धात अण्वस्त्रांचा वापर करू शकतो आणि ब्रिटनलाही (Britain)  त्यात ओढू शकतो. ऑस्ट्रेलियाने युद्धाची तयारी सुरू करावी, असेही पीटर डटन म्हणाले.


ऑस्ट्रेलियाला टार्गेट केले जाऊ शकते


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'द सन' च्या अहवालानुसार, अमेरिका आणि ब्रिटनसोबत  (US & UK) लष्करी करार केल्यावर ऑस्ट्रेलियाने चीनशी युद्ध होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. ऑस्ट्रेलियाचे संरक्षण मंत्री पीटर डटन यांनी मान्य केले आहे की, चीनसोबत तैवानवर युद्ध होण्याची प्रबळ शक्यता आहे. चिनी माध्यमांचा हवाला देत ते म्हणाले की, अनेक चिनी पाणबुड्या प्रशांत महासागरात गस्त घालत आहेत. अशा परिस्थितीत या पाणबुड्या ऑस्ट्रेलियाला अण्वस्त्र हल्ल्याचे लक्ष्य बनवू शकतात.


'चीनला शांतता नकोय'


ऑस्ट्रेलियन संरक्षण मंत्री AUKUS कराराच्या संदर्भात ते अमेरिकेत आहेत. ते म्हणाले की, नवीन युती ऑस्ट्रेलियाला किमान आठ आण्विक पाणबुड्या आणि इतर प्रगत लष्करी तंत्रज्ञान देईल. प्रदेशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी हा करार आवश्यक असल्याचे म्हटले आहे. मात्र, चीन शांततेऐवजी युद्धाची परिस्थिती निर्माण करू शकेल, अशी भीती होती. डटन म्हणाले की, "चिनी लोक तैवानच्या संदर्भात त्यांच्या हेतूंबद्दल अगदी स्पष्ट आहेत. अमेरिकादेखील तैवानच्या हेतूंबद्दल अगदी स्पष्ट आहे. कोणालाही संघर्ष नकोय, परंतु खरोखर चिनी लोकांसाठी हा एक प्रश्न आहे."


जॉन्सनने या कराराचा बचाव केला


दरम्यान, दक्षिण चीन समुद्राच्या लढाईत ब्रिटनला ओढण्याच्या भीतीमुळे बोरिस जॉन्सनने संसदेत AUKUS करारामध्ये सहभागी होण्याचा बचाव केला. पंतप्रधान म्हणाले की, ब्रिटन आंतरराष्ट्रीय कायद्याच्या संरक्षणासाठी कटिबद्ध आहे आणि त्यानुसार कार्य करेल. दरम्यान, चीनच्या विमानांनी पुन्हा एकदा तैवान सीमेवर घुसखोरी केली. तैवानने सांगितले की आठ चिनी लढाऊ विमाने आणि दोन सहाय्यक विमाने त्याच्या हद्दीत घुसली. चीनच्या या कृत्यांमुळे या प्रदेशातील तणाव वाढत आहे, असे ते म्हणाले.


Dragon का चिडला आहे?


ऑकसअंतर्गत, अमेरिका आणि ब्रिटनच्या मदतीने ऑस्ट्रेलिया अणुऊर्जेवर चालणाऱ्या पाणबुड्यांचा ताफा तयार करेल, ज्याचा उद्देश इंडो-पॅसिफिक प्रदेशात स्थिरता वाढवणे आहे. जेव्हापासून या कराराची बातमी समोर आली आहे, तेव्हापासून चीन (Dragon) संतापला आहे. ते म्हणतात की हा करार प्रादेशिक शांतता आणि स्थिरता पोकळ करेल. त्यांच्याबाजूने असेही म्हटले गेले की तीन देश शीतयुद्धाच्या मानसिकतेने काम करत आहेत. यामुळे शस्त्रास्त्रांची स्पर्धा वाढू शकते आणि अप्रसार न करण्याच्या आंतरराष्ट्रीय प्रयत्नांना हानी पोहोचू शकते.