न्यूयॉर्क : या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध लेखक सलमान रश्दीं (Salman Rushdie) यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. न्यूयॉर्कमध्ये (New York) हा प्राणघातक हल्ला केला गेला आहे. एका व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाआधीच हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यामुळे उपस्थितांमध्ये काही वेळ खळबळ उडाली. (author salman rushdie was attacked at an event in new york us) 


व्याख्यानाची सर्व तयारी झाली होती. व्याख्यान ऐकण्यासाठी सर्वच उत्सूक होते. मात्र व्याख्यानापूर्वीच स्टेजवर चढून एकानं चाकू हल्ला केला. यानंतर रश्दी जमिनीवर कोसळले. ते जखमी झाल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. हल्लेखोराला अटक करण्यात आलीय. सलमान रश्दी हे वादग्रस्त पुस्तक सॅटॅनिक व्हर्सेसचे लेखक आहेत.