अमेरिका : अमेरिकेतील आयव्हीएफ क्लिनिकच्या चुकीमुळे एका जोडप्याचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. आता न्यायाच्या अपेक्षेने पीडित दाम्पत्याने न्यायालयात धाव घेतली आहे. क्लिनिकच्या कर्मचार्‍यांनी चुकून आयव्हीएफ बदललं, ज्यामुळे महिलेने दुसर्‍याच्या मुलाला जन्म दिला. जेव्हा मूल त्याच्या पालकांपेक्षा पूर्णपणे वेगळे दिसत होतं तेव्हा ही चूक लक्षात आली.


2019 मध्ये दिला बाळाला जन्म


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीबीसीच्या रिपोर्टनुसार, अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये राहणाऱ्या डॅफ्ना आणि अलेक्झांडर कार्डिनेल यांनी मूल होण्याच्या आशेने आयव्हीएफ क्लिनिकचा रस्ता धरला. यानंतर डॅफ्नाने सप्टेंबर 2019 मध्ये एका मुलीला जन्म दिला जी तिच्यासारखी दिसत नव्हती. त्यानंतर क्लिनिकमध्ये काहीतरी गडबड असल्याचा संशय दाम्पत्याला आला.


पहिल्यांदाही समोर आल्यात अशा घटना


यानंतर या जोडप्याची डीएनए चाचणी केली असता संपूर्ण सत्य बाहेर आलंय. त्यानंतर डॅफ्ना आणि अलेक्झांडर कार्डिनेल यांनाही ते जोडपे सापडले ज्यांच्यासोबत IVF स्वॅब झाले. आयव्हीएफ बदलण्याची ही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.


दाम्पत्याने क्लिनिकवर लावला आरोप


पीडित दाम्पत्याने आता क्लिनिकवर निष्काळजीपणा आणि फसवणूक केल्याचा आरोप करत न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाचे सत्य समोर आल्यानंतर डॅफ्ना म्हणाली, 'आमचे बायोलॉजिकल मूल दुसऱ्याला देण्यात आलं होतं आणि ज्या मुलासाठी आम्ही प्रार्थना केली ते आमचे नव्हतं. ही खूप वेदनादायक भावना आहे'.


मुलीला पाहून आईला धक्काच बसला


2018च्या उन्हाळ्यात या जोडप्याने क्लिनिकशी संपर्क साधला होता आणि महिलेने 2019 मध्ये एका मुलाला जन्म दिला. कोर्टात पीडित कुटुंबाच्या वकिलाने सांगितलं की, मुलाच्या जन्मानंतर डॅफ्नाने जेव्हा त्याला पाहिलं तेव्हा तिला धक्काच बसला. कारण मुलाचा रंग खूप गडद होता. यानंतर कुटुंबीयांनी डीएनए करवून घेण्याचा विचार केला आणि जे सत्य समोर आले, त्याने सर्वांनाच हादरवून सोडलं.