मुंबई : अनेकदा लहान मुलं रमावं किंवा शांत रहावं यासाठी पालक मुलांच्या हातात मोबाइल देतात. किंवा टीव्हीवरती गेम लावून दिला जातो. मात्र पालकांची हीच सवय मुलांच्या जीवावर बेतते. यासोबतच पालकांना देखील असलेली टीव्हीची किंवा व्हिडीओ गेमची सवय ही अतिशय घातक आहे. या पालकांच्या सवयीमुळे 19 महिन्यांच्या मुलाने आपला जीव गमावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही घटना एअरड्री, स्कॉटलंड येथे घडली आहे. मुलीचे आई-वडील रात्रीच्या वेळी टीव्ही पाहण्यात आणि मोबाईलवर गेम खेळण्यात इतके व्यस्त होते की त्यांना कळलेच नाही की त्यांची 19 महिन्यांची मुलगी बेडवरून पडल्यावर कधी मरण पावली?



द मिररमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, मृत मुलीचे नाव कियारा कॉनरोय आहे. तपासात उघड झाले की, रात्रभर टीव्ही पाहिल्यानंतर आणि गेम खेळल्यानंतर पालक दुसऱ्या दिवशी दुपारी तीन वाजता उठले आणि बाळाला सोडून घराच्या दुसऱ्या खोलीत गेले.



स्कॉटलंडच्या एअरड्री कोर्टाने वडिलांना दोषी ठरवले आहे. चिमुकल्याच्या वडिलांवर मुलाची काळजी न घेण्याचा आरोप लावला आहे. तसेच  निर्दोष व्यक्तीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. मुलीच्या आईवरही आरोप झाले असले तरी न्यायालयाने तिची निर्दोष मुक्तता केली. 



मुलीच्या आईने सांगितले की, तिच्या मुलीच्या मृत्यूने तिला खूप दुःख झाले आहे. त्याच्या वाईट व्यसनामुळे निष्पाप मुलीने आपला जीव गमावला. मात्र, घटनेच्या दिवशी सकाळी मुलीला दूध दिले होते, असा मुलीच्या आईचा दावा आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालात असे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. मुलीच्या आई -वडिलांनी तिच्या मृत्यूपूर्वी तीन दिवसांपर्यंत तिला अन्नही दिले नाही, असे पोलीस तपासात उघड झाले आहे. याशिवाय, तो बराच काळ घरी एकटा राहिला.