Balenciaga : जगभरातले अनेक प्रख्यात फॅशन ब्रँड त्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पनांद्वारे उत्पादने बाजारात आणण्यासाठी ओळखले जातात. याच विचाराने लक्झरी फॅशन हाऊस बॅलेन्सियागाने सर्वात महागडी कचऱ्याची पिशवी लॉन्च केली आहे. ही पिशवी प्रत्यक्षात कचऱ्याच्या पिशवीसारखी दिसते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"ट्रॅश पाऊच" नावाच्या पिशवीच्या फोटोंनी सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. बॅलेन्सियागाच्या फॉल 2022 च्या रेडी-टू-वेअर कलेक्शनमध्ये ही बॅग लॉन्च करण्यात आली. यामध्ये मॉडेल बॅग हातात घेऊन रॅम्पवर चालत होत्या.


ही जगातील सर्वात महागडी कचऱ्याची पिशवी असल्याचे म्हटले जात आहे. या एका पिशवीची किंमत १ लाख ४२ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे. कंपनीने या कचऱ्याच्या पिशवीला ट्रॅश पाऊच नाव दिले आहे. बॅलेन्सियागाच्या या कचऱ्याच्या पिशवीची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.



ही पिशवी निळ्या, पिवळ्या, काळ्या आणि पांढऱ्या या चार रंगांमध्ये उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्याच्या पुढच्या बाजूला बॅलेन्सियागाचा लोगो छापलेला आहे. ही पिशवी चामड्यापासून बनलेली आहे आणि त्याच्या वरच्या बाजूला एक दोरी आहे.