Baloch Liberation Army attack : बलुचिस्तानमध्ये (Balochistan) बलुच लिबरेशन आर्मीच्या सैनिकांनी पाकिस्तानी लष्करावर जोरदार हल्ला चढवला आहे. ज्यामध्ये 100 हून अधिक पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याची माहिती आहे. बलुच लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात फ्रंटियर कॉर्प्सचे आयजी मेजर जनरल अयमान बिलाल सफदर यांचाही मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पाकिस्तानी लष्कर आणि बलुच लिबरेशन आर्मीमध्ये जोरदार युद्ध सुरू आहे. दोन आघाड्यांवर एकाच वेळी झालेल्या हल्ल्यामुळे पाकिस्तानच्या सैनिकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही त्यांची पळता भूई थोडी झाली. या हल्ल्यात पाकिस्तान सैनिकांची जीवित आणि मालमत्तेची मोठी हानी झाली आहे. 


पाकिस्तानच्या या भागात गृहयुद्धासारखी परिस्थिती आहे. बलुच लिबरेशन आर्मीने नोश्की आणि पंजुगुर भागात पाकिस्तानी आर्मीवर हल्ला केला आहे.


बलुचिस्तान मुव्हमेंट काय आहे?
बलुचिस्तान हा पाकिस्तानचा एक प्रांत आहे. या प्रांतातील लोकांना पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवं आहे. बलुचिस्तानी लोकं स्वतंत्र असल्याचा दावा करतात आणि पाकिस्तानने आपला कब्जा संपवावा अशी त्यांची इच्छा आहे. जगाच्या विविध भागात बलुच संघटना स्वातंत्र्याची मागणी करत आहेत. 


परदेशात निर्वासित राहणाऱ्या बलुचिस्तानमधील बहुतांश नेत्यांचे म्हणणे आहे की, पाकिस्तानच्या लष्कराने बलुच समुदायावर अत्याचार केले आहेत. पाकिस्तानने बलुचिस्तानला स्वतंत्र देश म्हणून मान्यता द्यावी, अशी बलुचिस्तानच्या नागरिकांची मागणी आहे.