बँकॉक : बँकॉक सध्या पर्यावरणाच्या संकटामुळे अडचणीत आहे. एका गंभीर इशाऱ्यानंतर येथील सरकारचं टेन्शन आणखी वाढणार आहे. कारण एका दशकानंतर हे शहर पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. थायलंडची राजधानी येथे संयुक्त राष्ट्रांचं जलवायु संमेलन होणार आहे. तापमान वाढल्याने वातावरण बदलण्याची शक्यता आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भुशभुशीत अशा जमिनीवर वसलेलं बँकॉक हे शहर समुद्र सपाटीपासून फक्त दीड मीटर उंच आहे. त्यामुळे जर समुद्राच्या पाण्याची पातळी वाढली तर हे शहर पाण्याखाली जाण्य़ाची शक्यता आहे. जकार्ता आणि मनीला या सराखे दक्षिण आशियातील शहरांवर देखील याची टांगती तलवार आहे.


पावसाचं प्रमाण, वातावरण बदल यामुळे 2030 पर्यंत बँकॉक हे शहर जवळपास 40 टक्के पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. सध्या राजधानी दरवर्षी एक ते दोन सेंटीमीटरने पाण्याखाली जात आहे. यामुळे येथे पूर येण्याची देखील शक्यता आहे. थायलंडच्या जवळ असलेल्या समुद्राती पातळी चार मिलीमीटरने दरवर्षी वाढत आहे.


बँकॉक हे शहर सुंदर अशा समुद्र किनाऱ्यांनी घेरलेलं आहे. येथे मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. बँकॉकमधील नाईट लाईफ, बार हे पर्यटकांचं विशेष आकर्षण असतं.