Bangladesh Voilence Who Is Khaleda Zia: बांगलादेशमध्ये मागील महिन्याभरापासून सुरु असलेल्या हिंसाचाराला सोमवारी नाट्यमय वळण मिळालं. पंतप्रधान शेख हसीना यांनी तडकाफडकी आपल्या पदाचा राजीनामा देऊन लष्करी हेलिकॉप्टरने भारत गाठला. सध्या शेख हसीना भारताच्या आश्रयाला आल्या आहेत. त्या पुढे लंडनला जातील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान मंगळवारी सकाळी बांगलादेशमधील सर्वपक्षीय बैठकीमध्ये विरोधकांनी सरकार स्थापनेसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याची तयारी दर्शवली असतानाच शेख हसीना यांच्यानंतर कोण असा प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच आता माजी पंतप्रधान खालिदा जिया यांचं नाव भावी पंतप्रधानांच्या शर्यतीत आघाडीवर असल्याचं मानलं जात आहे.


अचानक बांगलादेशमध्ये खालिदा जियांची चर्चा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी सोमवारी हसीना यांचा राजीनामा स्वीकार करतानाच माजी पंतप्रधान खालिदा जिया यांना मुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. अनेक प्रकरणामध्ये खालिदा यांना दोषी ठरवल्यानंतर त्या घरीच नजरकैदेत होत्या. शहाबुद्दीन यांनी संसद बरखास्त केल्यानंतर एक अंतरिम सरकार स्थापन करण्याचे आदेश दिले असून त्यासंदर्भात हलचाली सुरु आहेत. अशातच आता हसीना यांच्या कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या खालिदा जिया यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणामध्ये 17 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर 2018 साली त्यांना तुरुंगात डांबण्यात आलं होतं. आता नवीन सरकार सत्तेत येईल तेव्हा खालिदा जियाच पंतप्रधान असतील अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. पण या खालिदा जिया आहेत तरी कोण हे पाहूयात...


कोण आहेत खालिदा जिया?


78 वर्षीय खालिदा जिया या बांगलादेशमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीच्या प्रमुख आहेत. 15 ऑगस्ट 1945 रोजी खालिदा जिया यांचा जन्म स्वातंत्र्यपूर्व काळातील बंगालमधील जयपायगुडी येथे झालं. खालिदा जिया यांनी पती जियाउर रहमान यांची हत्या झाल्यानंतर सक्रीय राजकारणामध्ये प्रवेश केला. जियाउर रहमान हे 1977 ते 1981 दरम्यान बंगलादेशचे राष्ट्रपती होते. त्यांनीच 1978 मध्ये बंगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची स्थापना केली. याच पक्षाची धुरा संभाळताना पतीच्या मृत्यूनंतर दहा वर्षांनी म्हणजेच 1991 साली खालिदा जिया बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान ठरल्या. पाकिस्तानमधील बेनझीर भुट्टो यांच्यानंतर मुस्लीम देशामध्ये पंतप्रधान होणाऱ्या त्या दुसऱ्याच महिला ठरल्या.


नक्की वाचा >> 'ही' भांडखोर बाई मोदी सरकारबरोबरच संपूर्ण भारताचं टेन्शन वाढवणार? येता काळ आव्हानात्मक


भ्रष्टाचाराचे आरोप


2001 ते 2006 दरम्यान खालिदा जिया यांनी पंतप्रधान म्हणून आपला दुसरा कार्यकाळ पूर्ण केला. 2006 साली त्यांच्या सरकारचा कार्यकाल संपल्यानंतर 2007 मध्ये जानेवारी महिन्यातील निवडणुका राजकीय हिंसा आणि अंतर्गत कलहामुळे रद्द करण्यात आला. त्यानंतर काळजीवाहू सरकारवर लष्कराने ताबा मिळवला. या काळातील काळजीवाहू सरकारने खालिदा जिया आणि त्यांच्या दोन्ही मुलांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. सध्या खालिदा जिया यांना प्रकृतीसंदर्भात अनेक समस्या आहेत. त्यामुळेच त्या आरोग्यासंदर्भातील उपचारांसाठी परदेश दौऱ्यावर जात असतात.


दरम्यान, दुसरीकडे बंगलादेशमधील आंदोलकांनी शेख हसिना पळून गेल्यानंतर नोबेल पुरस्कार विजेता मोहम्मद यूनुस यांच्या नावाची अंतरिम पंतप्रधान म्हणून घोषणा केली आहे.