Bangladesh Crisis : बांगलादेशमध्ये सुरु असलेल्या हिंसाचाराची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरु आहे. सगळीकडे या संबंधीत संताप पाहायला मिळत आहे. हा सगळा हिंसाचार थांबण्याचं नाव घेत नाही आहे. तिथलं निदर्शन इतकं वाढलं आहे की त्या लोकांना आता फक्त राजाकारण्यांना नाही तर त्यांच्यासोबत कलाकारांवर देखील निशाणा साधला आहे. या सगळ्यात मोठी बातमी समोर आली आहे की अभिनेता शांतो खान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्यावर हल्ला करण्यात आला असून त्या हल्ल्यात त्यांचे निधन झाले आहे. शांतो खानचे वडील सलीम खान हे चांदपूर सदर उपजिल्हाच्या लक्ष्मीपूर मॉडेल युनियन परिषदेचे अध्यक्ष होते. त्याशिवाय ते चित्रपट निर्माता आणि दिग्दर्शकही होते. त्यांच्या हत्येनंतर आता सिनेविश्वात शोककळा पसरली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, शांतो खान आणि त्याचे वडील सलीम सोमवारी दुपारी घरून निघाले असताना फरक्काबाद मार्केटमध्ये हाणामारी झाली. तिथून ते कसे बसे निघाले आणि त्यांना काही क्षणात अचानक दुसऱ्या जमावाशी आमना सामना झाला. सुरुवातीला तर त्यांनी गोळ्या झाडात स्वत: चा बचाव केला, पण जेव्हा दुसऱ्या जमावानं त्यांच्यावर हल्ला केला तेव्हा त्या हल्ल्यात त्यांची हत्या झाली. 


सलीम खान आणि त्यांचा मुलगा शांतो खानवर अनेक तक्रारी होत्या. ते तुरुंगात देखील जाऊन आले आहेत. त्याशिवाय त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप होते. सलीम यांचा मुलगा शांतो खान याच्याविरुद्धही आयोगाने 3.25 कोटी रुपयांची बेकायदेशीर संपत्ती मिळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.


हेही वाचा : विजय वर्माच्या निधनाची पोस्ट VIRAL! स्वत: अभिनेत्यानं शेअर केला फोटो... चाहत्यांना बसला धक्का


बंगालमध्ये जे काही सुरु आहे त्यावर आता भारतातील बंगाली चित्रपटसृष्टी संबंधातील लोकांनी या संपूर्ण प्रकरणावर चिंता व्यक्त केली. त्याशिवाय तिथे सुरु असलेला हिंसाचार आणि जीवित हानी आणि मालमत्तेच्या हानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. अनेक बांगलादेशी चित्रपटांमध्ये काम केलेला टॉलीवूड अभिनेता जीत यानं त्याच्या X अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत दुःख व्यक्त केलं होतं. त्यानं ही सगळी दृश्ये हादरवणारी असल्याचे म्हटले आहे. जीतनं बांगलादेशच्या लोकांसाठी प्रार्थना केली आहे आणि आशा व्यक्त केली की यातून सगळे कसे बाहेर येतील याची खूप चिंता वाटते. बांगलादेशच्या लोकांसाठी मी प्रार्थना करतो की ते लवकरच या सगळ्या परिस्थितीतून बाहेर येतील. आपल्याला जे काही पाहायला मिळतंय, त्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या क्लिप्स आहेत. आता मला अजून असं काही पाहायची हिंम्मत नाही.