अफगानिस्तान : मीडियासाठी काळा दिवस; दहशतवादी हल्ल्यात १० पत्रकारांचा मृत्यू
दहशतवादी हे पत्रकाराच्या वेशात आले होते. आत्मघातकी हल्ला करत त्यांनी स्वत:ला उडवून दिले.
काबूल : अफगानिस्तानमध्ये सोमवारचा दिवस हा मीडियासाठी २००१ नंतरचा सर्वात घातक दिवस ठरला. अफगानिस्तानमध्ये अनेक ठिकाणी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ३७ लोक मारले गेले. ज्यात १० पत्रकार आणि ११ मुलांचाही समावेश आहे. इतर दोन ठिकाणी झालेल्या आत्मघातकी हल्ल्यात २५ लोक मारले गेले. तर, अंजास फ्रांन्सचे मुख्य छायाचित्रकार शाह मराई यांच्यासह कमीत कमी आठ पत्रकार मारले गेले. अफगानिस्तानच्या गृहमंत्रालयानेही मृत्यू पावलेल्या लोकांच्या संख्येची पुष्टी केली. तसेच, या हल्ल्यात ४९ लोक जखमी झाल्याचेही म्हटले. दरम्यान, जखमींचा आखडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
दहशतवाद्यांनी केला आत्मघातकी हल्ला
रिपोर्टर्स विदाऊट बॉर्डर्सच्या वृत्तानुसार, या हल्ल्याची जबाबदारी इस्लामिक स्टेट ग्रुपने घेतली आहे. जगभरातून या हल्ल्याचा निशेध केला जात आहे. जगभरातील नागरिकांनी पत्रकारांच्या मृत्यूबाबत दुख: व्यक्त केले आहे. काबुलचे पोलीस प्रवक्ता हशमत स्तानिकजाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसरा स्फोट पहिल्या स्फोटाच्या काही मिनीटांतच झाला. ज्यात घटनास्थळावर उपस्थित असलेल्या पत्रकारांचा मृत्यू झाला. दहशतवादी हे पत्रकाराच्या वेशात आले होते. आत्मघातकी हल्ला करत त्यांनी स्वत:ला उडवून दिले.
पत्रकाराच्या मृत्यूची बीबीसीनेही केली पुष्टी
मारले गेल्याला पत्रकारांमध्ये बीबीसीचे पत्रकार आणि अंजास फ्रांनस प्रेसच्या मुख्य छायाचित्रकाराचाही समावेश आहे. बीबीसीनेही आपल्या २९ वर्षीय पत्रकार अहमद शाहच्या मृत्यची पुष्टी केली आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या सीमेजवळील पूर्व प्रांतात झालेल्या विविध दहशतवाधी हल्ल्यात ते मारले गेल्याचे बीबीसीने म्हटले आहे.