ब्रिस्टल: काहीवेळा अशा घटना घडतात की आपल्याला पाहून हैराण व्हायला होतं. एका अस्वलानं चक्क टॉयलेट पेपर चोरल्याची मजेशीर घटना समोर आली आहे. हे नेमकं त्याने का चोरलं असावं असा प्रश्न पडला आहे. पण हा प्रकार एका व्यक्तीनं सोशल मीडियावर याबाबत माहिती देत व्हिडीओ शेअर केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका महिलेनं आपल्या घरी अमेझॉनवरून पार्सल मागवलं. डिलिव्हरी बॉयनं पार्सल घराबाहेर ठेवलं आणि तो निघून गेला. मात्र घराबाहेर पार्सल नसल्यानं महिलेला धक्का बसला. सुरुवातीला वाटलं की पार्सल कोणी उचलून नेलं असावं. अखेर तिने शोध घेण्यासाठी घराबाहेरचा सीसीटीव्ही चेक केला आणि चोर सापडला. एक अस्वल अमेझॉनचं पार्सल उचलून घेऊन गेलं होतं. 


ब्रिस्टलमध्ये राहणारी महिला क्रिस्टिन लेविन यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. त्यांनी सीसीटीव्ही व्हिडीओ तपासल्यानंतर हा प्रकार समोर आला. त्यांनी याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.



महिला पुढे म्हणाली की सुदैवानं यामध्ये महत्त्वाचं काही नव्हतं. त्यामध्ये टॉयलेट पेपर होते जे अमेझॉनवरून मागवले होते. मात्र आता चोरीला गेलेल्य़ा या पार्सलची भरपाई अमेझॉन करून देऊ शकतं का? असा प्रश्न या महिलेनं विचारला आहे. अस्वलानं यामध्ये खाणं असावं असं समजून हे पार्सल उचललं असावं का? असाही प्रश्न विचारला जात आहे. या चोरी करणाऱ्या अस्वलाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.