Woman Proudly Flaunts Facial Hair:  कोणाचं काय तर कोणाचं काय, सोशल मीडियाच्या (Social media) जगात कोण कधी कसं प्रसिद्ध होईल सांगता येतं नाही. सोशल मीडियावर एक महिला सध्या सगळ्या जगाचं हो अगदी सगळ्या जगाचं लक्ष वेधून घेते आहे. ही महिला पुरुषांप्रमाणे दाढीमिशा ठेवते आणि येवढंच नाही तर मोठ्या मानाने समाजात फिरते. 


दाढी-मिशी स्वॅग (Beard-mustache swag)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

LaRae Perkins असं या महिलेचं नाव आहे. पुरुषांप्रमाणे चेहऱ्यावर दाढी-मिशा वाढवून ती मस्त फिरते. PCOS मुळे ती सामान्य महिलांपेक्षा वेगळी दिसते, पण त्यामुळे तिच्या आत्मविश्वासावर परिणाम होत नाही. तिला पाहणाऱ्यांना कदाचित ही गोष्ट आवडणार नाही किंवा पटणारही नाही...पण प्रत्येकाचं आपलं आयुष्य आहे आणि ते कसं जगायचा याचा अधिकारही त्याचा आहे. या महिलेला अनेकांनी सोशल मीडियावर ट्रोल केलं आहे. पण तरीदेखील ती कधी डगमगली नाही. 


कॅलिफोर्निया (California), यूएसएमधील (USA) 40 वर्षीय लारे पर्किन्स यांना वयाच्या 12 व्या वर्षी पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचे (Polycystic ovary syndrome) निदान झाले होते... ज्याला सामान्यतः पीसीओएस म्हणून ओळखलं जातं. या आजारामुळे लारेच्या चेहऱ्यावर पुरुषांप्रमाणेच दाढी आणि मिशा वाढू लागल्या. तिच्या शरीरात एंड्रोजन हार्मोनच्या वाढीमुळे हा परिणाम दिसून येतो. अशा परिस्थितीत लहानपणापासूनच चेहऱ्यावर केस येत असल्याने त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. तिला लाज वाटायची, पण नंतर ती तिच्या व्यक्तिमत्त्वाचा एक भाग म्हणून तिने ते स्वीकारलं.


पाहा व्हिडीओ



फॅशन डिझायनर म्हणून कमवलं नाव


लारेने आता स्वत:चा वेगळा कपड्यांचा ब्रँड लॉन्च केला आहे, ज्याद्वारे ती महिलांना सक्षम बनवायचे काम करते...तिच्या ब्रँडचे घोषवाक्य आहे - 'होय, मी एक मुलगी आहे'. तिने स्वतःवर प्रेम करायला शिकली आहे...