नवी दिल्ली : मानवांना अनेक गोष्टींसाठी प्रशिक्षित केलं जातं किंवा एकमेकांना बघून माणूस शिकत असतो. पण जगभरात असे काही प्राणी आहेत, ज्यांचे कारनामे पाहून विश्वास ठेवणंही कठिण होतं. असाच पाण्यात राहणाऱ्या व्हेल माशाचा कारनामा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेल्युगा व्हेल (Beluga Whale)माशाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आयआरएस अधिकारी नवीद ट्रम्बू(IRS Officer Naveed Trumboo)यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ रशियाचा असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओमध्ये दोन मित्र पाण्यातील बेल्युगा व्हेलचे फोटो काढत असल्याचं दिसतंय. अचानक एकाचा फोन पाण्यात पडतो. खोल पाण्यात पडलेला फोन काढणं सोपं कामं नाही. या दोघांनाही असंच वाटत असावं. पण त्यांना अंदाजच नव्हता की यासाठी कोण त्यांच्या मदतीसाठी येणार आहे. ज्या व्हेलचे फोटो दोघे जण काढत होते, त्याच व्हेल माशाने खोल पाण्यातून फोन शोधून काढला आणि त्या व्यक्तीला परतही दिला. 



बेल्युगा व्हेल नावाने प्रसिद्ध असणारा हा पांढऱ्या रंगाचा मासा आर्कटिक महासागर (Arctic Ocean), उत्तर अमेरिका (North America), रशिया (Russia) आणि ग्रीनलँडच्या (Greenland)समुद्रात आढळत असल्याची माहिती आहे. हे व्हेल मासे माणसांची भाषा समजत आणि बोलत असल्याही दावा काही लोकांनी केला आहे.