Biden At State Dinner PM Modi laugh: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Biden) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) गुरुवारी (अमेरिकन स्थानिक वेळेनुसार) व्हाइट हाऊसमध्ये स्टेट डिनरचा आस्वाद घेतला. यावेळेस दिलेल्या छोटेखाणी भाषणामध्ये बायडन यांनी केलेल्या एका विधानावरुन उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. बायडेन आणि मोदी यांनी अमेरिकन परंपरेप्रमाणे टोस्ट (जेवणाआधी पेय घेण्याची पद्धत) रेज केलं. मात्र पंतप्रधान मोदी हे शाकाहारी आहेत. मोदी मद्यसेवन करत नाही. याच मुद्द्याचा अप्रत्यक्षपणे उल्लेख करत बायडेन यांनी आपल्या आजोबांची आठवण काढत केलेल्या विधानामुळे मोदींनाही हसू अनावर झाल्याचं पहायला मिळालं. 


बायडेन यांचं मजेदार विधान


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदींसाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्टेट डिनरला तब्बल 400 अति महत्वाचे पाहुणे उपस्थित होते. यामध्ये उद्योजक मुकेश अंबानी, निता अंबानी, गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई, मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला, भारतीय उद्योजक आनंद महिंद्रा, भारताचे सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, अॅपल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यासारख्या मान्यवरांचाही समावेश होता. या सर्वांसमोर बोलताना बायडेन यांनी आजोबा अम्बररोज पिनगन यांचा उल्लेख करत 'टोस्ट रेज' करण्यासंदर्भात एक मजेदार विधान केलं.


मोदींनी हसू अनावर


बायडेन यांनी हातातील ग्लासकडे पाहत मोदी बाजूला उभे असतानाच, "जर तुमच्या हातात टोस्ट (पेय असलेलं ग्लास) देण्यात आलं आणि त्यामध्ये अल्कोहोल (दारु) नसेल तर तुम्ही ते डाव्या हातात पकडायला हवं. तुम्हाला वाटत असेल मी विनोद करतोय पण असं नाहीय (मला आजोबांनी खरंच असं सांगितलं होतं)" असं विधान केलं. हे विधान ऐकताच पंतप्रधान मोदी हसू लागले. विशेष म्हणजे यावेळेस मोदींनी उजव्या हातात टोस्टचा ग्लास पकडला होता.


भाषांतर करणारीही गोंधळली


बायडेन यांची विधानं हिंदीमध्ये भाषांतरीत करण्यासाठी मंचावर असलेल्या महिलेला या वाक्याचं भाषांतर करायचं आहे की नाही हे काही क्षण समजलं नाही. सामान्यपणे राष्ट्राध्यक्षांचं वाक्य संपल्यानंतर लगेच ट्रान्सलेटर्स ते वाक्य अन्य भाषेत बोलू लागतात. मात्र बायडेन यांच्या या विधानानंतर या महिलेला काही सुचलेच नाही. त्यानंतर बायडेन यांनी हसत या महिलेकडे पाहिले आणि सर्व उपस्थित पुन्हा हसू लागले. बायडेन यांनी त्यांच्या आजोबांच्या सल्लाप्रमाणे डाव्या हातानेच टोस्ट रेज केल्याचं पहायला मिळालं. पंतप्रधान मोदी आणि बायडेन यांच्या हातातील ग्लासामध्ये जिंजरेल (आल्याचा स्वाद असलेलं पेय) होतं. 



अमेरिकी क्रिकेटला शुभेच्छा


पंतप्रधान मोदींनी आपल्या डीनर स्पीचमध्ये अमेरिकेमध्येही क्रिकेट लोकप्रिय होत असल्याचा उल्लेख करत अमेरिकन संघ पुढील वर्षी होणाऱ्या विश्वचषकामध्ये खेळण्यासाठी तयारी करत असल्याचं कळलं. माझ्या शुभेच्छा या टीमबरोबर आहेत असं पंतप्रधान मोदींनी म्हटलं.