वॉशिंग्टन : आतापर्यंतचा सर्वाधिक मोठा एस्ट्रॉयड लघुग्रह १ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या अगदी जवळून जाणार आहे. मात्र यामुळे कुणालाही कोणताही धोका होणार का? अशी चर्चा रंगली असताना नासाने दिलेल्या माहितीनुसार कुणालाही याचा त्रास होणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आणि ते एस्ट्रॉयड लघुग्रह अगदी सुरक्षित पद्धतीने पृथ्वीजवळून जाणार आहे. हा लघुग्रह पृथ्वीपासून ७० लाख किमीच्या अंतरावरून जाणार आहे. नासाच्या माहितीनुसार हे अंतर पृथ्वी आणि चंद्रापासून १८ वेळा लांब असणार आहे. एस्ट्रॉयड  फ्लोरेंस हा पृथ्वीच्या जवळील सर्वात मोठा उपग्रह मानला जात आहे. याचा आकार खूप मोठा असून नासाच्या स्पिटजर स्पेस टेलीस्कोप आणि नियोवाइज मिशनच्या अनुसार याचा आकार जवळपास ४.४ किमीचे असणार आहे. 


नासाच्या सेंटर फॉर निअर अर्थ ऑब्जेक्ट स्टडीजचे पॉल चूडास यांनी सांगितले की, १ सप्टेंबर रोजी फ्लोरेंस आणि पृथ्वीच्या मध्ये असणारी जी दरीतून हा ग्रह जाणार आहे.आणि त्या सर्व लघुग्रहांचे आकार सर्वाधिक कमी होते. त्यांनी सांगितले की, जेव्हापासून नासाने पृथ्वी आणि त्याच्या आजूबाजूतील ग्रहांवर लक्ष ठेवण्याचं काम केलं आहे. तेव्हापासून एस्ट्रॉयड फ्लोरेंस हा सर्वात मोठा उपग्रह येथेून जात आहे. त्यामुळे याचा परिणाम पृथ्वीवर होत नसला तरीही ही खूप मोठी गोष्ट आहे.