लंडन : ब्रिटनच्या संसदभवनावर असलेल्या टॉवर क्लॉकमधलं बिग बेन या जगप्रसिद्ध घड्याळाचे टोले पुढली चार वर्षं पडणार नाहीत. टॉवरच्या दुरुस्तीसाठी खबरदारीचा उपाय म्हणून घड्याळ बंद कऱण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तब्बल 157 वर्षं अविरत सुरू असलेल्या या घड्याळाची टिकटिक काही काळासाठी थांबणार आहे. नव्या वर्षाचं स्वागत असो की ख्रिसमस, बिग बेनच्या ठोक्यांची लंडनवासियांना सवयच झालीये. 


मात्र 13.7 टन वजनाच्या या घंटेपासून कामगारांना इजा होऊ नये, यासाठी घड्याळाचे टोले थांबवण्यात आलेत. यामुळे लंडनवासियांसोबतच खास हे घड्याळ पाहण्यासाठी आणि त्याचे टोले ऐकण्यासाठी येणारे पर्यटकही नाराज झालेत.