India Pakistan : पाकिस्तानचे माजी (Imran Khan) पंतप्रधान इमरान खान यांना ताब्यात घेतल्यानंतर देशात अराजकता माजली आणि त्यानंतर पाकिस्तानमधील (Pakistan) दाहक परिस्थिती संपूर्ण जगानं पाहिली. दरम्यान, शेजारी राष्ट्रामध्ये सुरु असणाऱ्या सर्व हालचालींमुळं आता भारतही सतर्क झाला असून, सीमाभागानजीक असणाऱ्या (Jammu kashmir) जम्मू- काश्मीरमध्ये परिस्थितीचं गांभीर्य पाहता लष्कराकडून काही महत्त्वाची पावलं उचलली जात असल्याची माहिती समोर येत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशांतर्गत अराजकता आणि तत्सम परिस्थितीवरून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तानचं लष्कर आणि गुप्तचर यंत्रणा  इंटर सर्विसेस इंटेलीजेंस (आईएसआई) सथ्या नियंत्रण रेषेनजीक एक मोठा कट रचत असल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि सैन्याशी संबंधित अधिकृत सूत्रांनी दिली आहे. देशात तणावाची परिस्थिती दिवसागणिक वाढत असतानाच आता म्हणे पाकिस्तानकडून भारताला लागून असणाऱ्या सीमाभागातील लाँचपॅडवर सैन्य नव्हे, मोठ्या संख्येनं दहशतवादी तैनात केले आहेत. 


'सध्या असंच चित्र दिसत आहे, की पाकिस्कानमधील अंतर्गत तणावाची परिस्थिती दहशतवादाला दुजोरा देण्याच्या बाबतीत काहीच परिणाम करत नाहीये. परिणामी भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषेनजीक असणाऱ्या लाँचपॅडवर शेजारी राष्ट्राकडून मोठ्या संख्येनं दहशतवाद्यांना तैनात करण्यात आलं आहे. गुप्तचर यंत्रणांच्या हाती आलेल्या माहितीनुसार बरेच दहशतवादी सध्याच्या घडीला त्यांच्या तळांवरून या लाँचपॅडवर आले असून, आता पुढं ते भारताच्या दिशेनं पाठवले जाण्याच्या प्रतीक्षेत आहेत', अशी माहिती संरक्षण विभागाशी संलग्न सूत्रांनी दिली. 


हेसुद्धा वाचा : इथे महाराष्ट्रात उकाडा वाढला, तिथे Cyclone Mocha च्या हाती गेली मान्सूनच्या गतीची सूत्र 


नीलम व्हॅली, लीपा व्हॅली आणि झेलम व्हॅली या भागामध्ये साधारण 10 ते 20 जणांच्या तुकड्यांमध्ये हे दहशतवादी पुढील आदेशाच्या प्रतीक्षेत असल्याचं म्हटलं जात आहे. 


भारतावर हल्ला करण्याचा डाव? 


23- 24 मे 2023 रोजी काश्मीरच्या खोऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या G20 बैठकांच्या धर्तीवर भारतातील परिस्थितीत तणाव निर्माण करण्यासाठीच पाकिस्तानच्या लष्कराकडून हा कावेबाजपणा केला जात असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळं आता सीमेपलीकडे सुरु असणाऱ्या प्रत्येक हालचालीवर भारतीय सैन्याकडून करडी नजरही ठेवली जात आहे. 


सध्याच्या घडीला पाकिस्तानच्या लष्कराच्या सीमाभागातील हालचाली कमी झाल्या असल्या तरीही सीमेवरील तळांमध्ये असणाऱ्या त्यांच्या सैन्याच्या संख्येत मात्र घट झालेली नाही ही बाब लक्षात घेण्याजोगी. 


कोणत्या भागांना सर्वाधिक धोका? 


पाकिस्तानकडून दहशतवाद्यांच्या मदतीनं भारतातील लष्करी तळ आणि केंद्रांसोबतच सैनिक शाळा, संरक्षण दलांची वाहनं आणि महत्त्वाच्या ठिकाणांना येत्या काळात निशाणा केलं जाऊ शकतं. यामध्ये यामध्ये ड्रोन हल्लासोबतच आत्मघातकी हल्ल्यांचाही समावेश असू शकतो अशी भीती यंत्रणांतडून व्यक्त करण्यात आली आहे. सीमाभागात असणाऱ्या पुंछ, राजोरी या भागांना सध्या सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, धोका पाहता अखनूर, कठुआ, जम्मू येथील सैन्य शाळा बंद ठेवण्याचा निर्णय़ही घेण्यात आला आहे.