World Biggest Data Leak: जगातील आजर्पंतचे सर्वात मोठे डेटा लीक प्रकरण उघडकीस आले आहे. जगभरात एकाचवेळी 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला गेली आहे. जगातील या आजपर्यंतच्या सर्वात मोठ्या डेटा चोरीमुळे खळबळ उडाली आहे. एकाचवेळी इतकी प्रकरण उघडकीस आल्यामुळे सायबर पथक देखील शॉक झाले आहे. 


काय आहे नेमकं हे डेटा चोरीचे प्रकरण? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

साइबर न्यूजने याबाबतचा रिपोर्ट दिला आहे. 26 अब्ज अकाउंट्सची खासगी माहिती चोरीला गेली आहे. LinkedIn, Snapchat, Venmo, Adobe आणि X या सोशल प्लॅटफॉर्मवरील युजर्सचा हा खाजगी डेटा लीक झाला आहे. जगातील आतापर्यंतचे हे सर्वात मोठे डेटा लीक प्रकरण असल्याची माहिती देखील समोर येत आहे. 


युर्जर्सचा संवेदनशील डेटा देखील लीक


डेटा चोरीचे हे प्रकरण अतिशय चिंताजनक आहे. कारण, युजर्सची बेसीक माहिती यासह त्यांच्या संवेदनशील डेटा देखील लीक झाल्याची माहिती समोर येत आहे. अशा प्रकारे डेटा चोरी हे युजर्सच्या प्रायव्हसीच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक ठरु शकते अशी भिती देखील सायबर एक्सपर्टकडून व्यक्त केली जात आहे. 


हॅकर्सचा धोका वाढला


या डेटा चोरी प्रकरणामुळे हॅकर्सचा धोका वाढला आहे. चोरी केलेल्या या डेटाच्या मदतीने हॅकर्स अनेकांना सहज टार्गेट करु शकता. फिशिंग स्कीम, टारर्गेटेड सायबर क्राईम यासारख्या घटना घडू शकतात. सायबर न्यूजचे सुरक्षा संशोधक मँटास सासनाउस्कस यांनी ही शक्यता व्यक्त केली आहे.


सर्वात जास्त कुणाचा डेटा चोरीला गेला?


चिनी इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म टेनसेंटचा सर्वाधिक डेटा चोरीला गेला आहे. 1.4 अब्ज युजर्सचा डेटा लीक झाला आहे. दुसऱ्या स्थानावर Weibo ही कंपनी आहे. या कंपनीचा 504 दशलक्ष अकाऊंट्सचा डेटा लीक झाला आहे. यानंतर MySpace च्या 36 कोटी अकाउंट्समधून डेटा चोरी झाली आहे. ट्विटरच्या 28.1 कोटी यूजर्स, तर, म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म Deezer च्या 25.8 कोटी यूजर्स आणि LinkedIn च्या 25.1 कोटी यूजर्सचा डेटा लीक झाला आहे.  याशिवाय Adobe, Telegram, Dropbox, Doordash, Canva आणि Snapchat  अनेक प्लॅटफॉर्मवरील डेटा चोरीला गेला आहे.


असं चेक करा तुमचा डेटा चोरीला गेला आहे की नाही?


तुमचा डेटा लिक झाला असावा अशी भिती वाटत असल्यास तुम्ही तात्काळ ते तपासू शकता. https://cybernews.com/personal-data-leak-check/ या वेबसाइटवर तुम्ही हे तपासू शकता. या वेबसाईटवर ईमेल आयडी टाकून Check Now वर क्लिक केल्यावर तुमचा डेटा चोरीला गेला आहे नाही याबाबतची माहिती उपलब्ध होईल.