मुंबई : जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि मायक्रोसॉफ्टचे मालक बिल गेट्स (Bill Gates) यांनी एक सुपरयॉट (Superyacht) विकत घेतलं आहे. हा सुपरयॉट फक्त लिक्विड हायड्रोजन (Liquid Hydrogen)वर चालणार आहे. या भव्य यॉटमुळे पर्यावरणाला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. तर या भव्य आणि आलिशान यॉटची किंमत तब्बल ६५४ मिलियन डॉलर आहे. म्हणजे भारतीय चलनानुसार या यॉटची किंमत ४ हजार ६०० कोटी रूपये सांगण्यात येत आहे.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्यावर्षी या सुपरयॉटचा आराखडा मोनेको यॉट शोमध्ये जाहीर केला होता. आतापर्यंत साकारण्यात आलेल्या सर्वात विशाल आणि महाग यॉटपैकी हा सुपरयॉट आहे. या सुपरयॉटची उंची ३७० फुट आहे. यामधीन खास वैशिष्ट्य म्हणजे एकदा की यॉटमध्ये लिक्विड हायड्रोजन भरल्यानंतर जवळपास ६४३७ किलोमीटर अंतर कापू शकेल. या सुपरयॉटमध्ये २८ टनचे दोन व्हॅक्यूम सिल्ड टँक आहेत. 


बिल गेट्सयांच्या सुपरयॉटमध्ये १४ पाहुणे आणि ३१ क्रू-मेंबर्सची व्यवस्था करण्यात आली आहे. शिवाय यामध्ये एक जिम, योगा स्टुडिओ, ब्यूटी रूम, मसाज पार्लर आणि स्विमिंगपूल देखील आहे. त्याचप्रमाणे हा सुपरयॉट ३१ किमी प्रती तास वेगाने धावणार आहे. पण इकोफ्रेंडली सुपरयॉटला तयार होण्यासाठी आणखी चार वर्षांचा कालावधी लागणार आहे.