जगभरातील अनेक बड्या कंपन्या नोकरकपात करतायत. या नोकरकपातीत मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना (Employee) कामावरून काढले जात आहेत.असे असताना एका कंपनीच्या मालकाने या घटनेला छेद दिला आहे. त्याने थेट कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत,त्यांना सुट्टीवर पाठवले आहे. कंपनीच्या मालकाने कर्मचाऱ्यांसाठी एक ट्रिप प्लान (Trip plan) केली आहे. आणि या ट्रिपमध्ये त्यांना पाठवले आहे. या ट्रिपवर जाण्याचा येण्याचा संपुर्ण खर्च हा मालक करणार आहे. त्यामुळे या अनोख्या ट्रिपने कर्मचारी देखील आनंदी झाले आहेत. 


कोण आहे हा मालक? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरीकन व्यायसायिक केन ग्रिफिन (Ken Griffin) (54 वर्षीय) फ्लोरिडाचे रहिवासी आहेत. ग्रिफिन हे सिटाडेल आणि सिटाडेल सिक्युरिटीजचे मालक आहेत. त्यांची एकूण संपत्ती 2600 अब्ज रुपये आहे. या गिफ्रिन यांनी आपल्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठे सरप्राईज दिले आहे. 


कर्मचाऱ्यांना 3 दिवसांच्या ट्रीपवर पाठवले


केन ग्रिफिन (Ken Griffin) यांनी त्यांच्या कंपनीतील 10 हजार कर्मचाऱ्यांना त्यांच्या कुटूंबियांसह डिस्ने वर्ल्डच्या (Walt Disney World) सहलीला नेले आहे. या संपुर्ण सहलीचा खर्च केन ग्रिफिन यांनी केला आहे. ग्रिफिन यांनी स्वत:च्या खिशातून पैसे खर्च करून कर्मचाऱ्यांना डिस्ने वर्ल्डच्या सहलीला नेले. कर्मचार्‍यांचा प्रवास, राहणे, जेवण यासाठी सर्व पैसे स्वत:च्या खिशातून दिले आहे. 


मीडिया रिपोर्टनुसार, कंपनीच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांसोबत वॉल्ट डिस्ने वर्ल्ड ट्रिपला (Walt Disney World) गेले होते. यादरम्यान ग्रिफिनने विमानापासून हॉटेलपर्यंतचा सर्व खर्च उचलला होता. या प्रकरणात सिटाडेलच्या प्रवक्त्याने सांगितले की, ग्रिफिनने न्यूयॉर्क, ह्यूस्टन, पॅरिस, झुरिच आणि इतर शहरांच्या विमान तिकिटांसाठी पैसे दिले होते. तसेच  हॉटेल, थीम पार्कची तिकिटे आणि जेवण आणि पार्किंगसाठीही पैसे दिले होते. 


दरम्यान कंपनी 2020 मध्येच कर्मचाऱ्यांना ट्रीपवर (Trip plan) नेणार होती. मात्र कोरोनामुळे ती रद्द करावी लागली होती. त्यानंतर आता 2022 मध्ये कोरोना संपल्यानंतर कंपनीने कर्मचाऱ्यांसाठी ट्रिप प्लान केली होती. आणि ही ट्रिप त्यांनी यशस्वी करून दाखवली. 


दरम्यान कंपनीने दिलेले हे सरप्राईज पाहून कर्मचारी देखील भारावून गेले आहेत. तसेच कर्मचाऱ्यांनी मालकाच्या या निर्णय़ावर आनंद व्यक्त केला आहे.