Romance Contract: एकाच वेळी तिघं रिलेशनशिपमध्ये, भांडण टाळण्यासाठी असा केला करार
तीन जण एकमेकांच्या संमतीने रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. विशेष म्हणजे या तिघांमध्ये एकदाही भांडण झालेलं नाही.
Bisexual Girl Relationship with Two People in one time: प्रेमसंबंध म्हटलं की दोन जणांमधील प्रेमळ नातं..पण या प्रेमसंबंधात तिसऱ्या व्यक्तीची एन्ट्री झाली की, दुरावा निर्माण होतो. अमेरिकेतील ओक्लाहोमामध्ये वेगळाच प्रकार समोर आहे. दोघात तिसरा, तोही आपलाच अशी म्हणायची वेळ आहे. एक तरुणी एकाच वेळी बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. म्हणजेच तीन जण एकमेकांच्या संमतीने रिलेशनशिपमध्ये राहात आहेत. विशेष म्हणजे या तिघांमध्ये एकदाही भांडण झालेलं नाही. रिपोर्टनुसार, अमेरिकेतील ओक्लाहोमा येथे राहणारी 26 वर्षीय तरुणी इरी इव्हर्स ही बायसेक्शुअल आहे.
बायसेक्शुअल म्हणजेच एकाच वेळी स्त्री किंवा पुरुष दोघांकडूनही सेक्सकडे आकर्षित होऊ शकतात. इरी इव्हर्स ही तरुणी 33 वर्षीय टॉम स्मिथ (मुलगा) आणि 32 वर्षीय अॅलेक्स जोन्स (मुलगी) यांच्या प्रेमात असून दोघांना वेगवेगळा वेळ देते. इरीने टाइम टेबल बनवण्यासोबतच त्यांच्यात भांडण होऊ नये यासाठी दोन्ही पार्टनरसोबत 'रोमान्स कॉन्ट्रॅक्ट'ही केला आहे. इरीचा असा विश्वास आहे की या करारामुळेच त्यांचे नाते दीर्घकाळ टीकून आहे.
करारानुसार इरी बाहेर असते तेव्हा तिचा प्रियकर टॉम हा अॅलेक्सला डेट करतो. याबाबत इरीने सांगितलं की, 'मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की, मला दोन प्रेम करणारे लोक मिळाले. एकाच वेळी एकापेक्षा जास्त व्यक्तींवर प्रेम करणे अशक्य वाटते, परंतु जेव्हा टॉम आणि अॅलेक्सचा विचार केला जातो तेव्हा माझ्यासाठी हे खूप सोपे आहे.' इरीने पुढे सांगितले की, 'टॉमसोबतचे नाते सप्टेंबर 2015 मध्ये एका डेटिंग वेबसाइटवर सुरू झाले. 2 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर मला कळलं की, मी बायसेक्शुअल आहे. यानंतरही त्याने माझ्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर जानेवारी 2021 मध्ये अॅलेक्स आली. त्यानंतर भविष्यात कधीही भांडण होऊ नये यासाठी आम्ही करारावर सही करण्याचे ठरवले.'
इरीने सांगितले की, मी सोमवार आणि बुधवारी अॅलेक्ससोबत वेळ घालवते, तर मंगळवार आणि गुरुवारी टॉमसोबत असते. शनिवार-रविवार आम्ही सगळे एकत्र राहतो आणि मजा करतो. इरीचे म्हणणे आहे की, 'तिच्या पालकांनाही या नात्यावर कोणताही आक्षेप नाही.'