नवी दिल्ली : मोदी सरकारने सत्तेत आल्यानंतर काळापैसा समुळ नष्ट करण्याची मोहिम हाती घेतली आहे. स्विस बँकेत पैसा दडवलेल्या भारतीयांवर कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. स्वित्झर्लंडच्या अधिकाऱ्यांकडून भारताला आणखी पन्नास जणांच्या खात्यांची माहिती देण्यात आली आहे.
 
काळा पैसा बाहेर काढण्याच्या मोहिमेअंतर्गत सुरू असलेल्या प्रयत्नात पन्नास भारतीय नागरिकांच्या खात्यांची माहिती स्विस बँक भारत सरकारला देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन्ही देशातील नियामक आणि अंमलबजावणी संस्थांनी त्यासाठी सहकार्य केले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बेकायदेशीररित्या स्विस बँकेत पैसे दडवणाऱ्या लोकांविरोधात आता फास आवळला जाणार आहे. ज्या लोकांच्या खात्यांची माहिती भारत सरकारला दिली जाणार आहे त्यात कंपन्यांशी संबंधित उद्योगपतींचा समावेश आहे. त्यात काही नावे बनावट आहेत. आर्थिक सेवा, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी वस्तू, कापड उद्योग, स्थावर मालमत्ता, दूरसंचार, रंग, गृह सजावट, हिरे आणि दागिने या उद्योगातील व्यक्तींचा यात समावेश आहे.