न्यूयॉर्क : भारताचा ७१ वा स्वातंत्रदिन साजरा करण्यासाठी अमेरीकेतील हजारो भारतीय न्यूयॉर्कमध्ये एकत्रित झाले. न्यूयॉर्क परेडमध्ये सगळे भारतीय पारंपरिक वेशात सहभागी झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वातंत्रदिनानिमित्त भारताबाहेर होणाऱ्या मोठ्या परेडपैकी न्यूयॉर्क परेड ही एक आहे. या प्रसंगी बाहुबलीचे राणा दग्गुबाती आणि तमन्ना भाटिया उपस्थित होते. त्याचे काही फोटोज तमन्नाने सोशल मीडियावर शेयर केले. 



३७ व्या इंडिया परेडचे आयोजन फेडरेशन ऑफ इंडियन असोसिएशन्स-न्यूयार्क, न्यूजर्सी यांनी एकत्रितपणे केले होते. या परेड मध्ये भारतीयअमेरिकन मुलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले.  न्यूयॉर्कचे मेयर बिल डी यांनी परेडमध्ये सहभागी झालेल्या लोकांचे अभिनंदन केले आणि भारतीय-अमेरिकन लोकांनी शहरासाठी दिलेल्या योगदानांबद्दल आनंद व्यक्त केला. 


त्यांनी सांगितले की, "हा असा दिवस आहे ज्यादिवशी आम्ही शहरातील लोकांचे योगदान साजरे करतो. मग ते कसे दिसतात, कोणतीही भाषा बोललात किंवा त्याचा जन्म कोठे झालाय हे महत्त्वाचे ठरत नाही. येथे प्रत्येकजण न्यूयॉर्क शहर अधिकाधिक चांगले होण्यासाठी आपआपल्या परीने योगदान देत असतो आणि त्यामुळेच अमेरिका खंबीरपणे उभी आहे. आणि आज आम्ही याचाच आनंद साजरा करत आहोत." हातात तिरंगा घेऊन न्यूयॉर्कचे मेयर हजारो लोकांना हात हलवून अभिवादन करत होते.