चीनमध्ये भारत, अमेरिकेच्या दूतावासाजवळ बॉम्ब हल्ला
दूतावास सर्वात सुरक्षित स्थळांपैंकी एक मानलं जातं
बीजिंग : चीनची राजधानी बीजिंगमध्ये भारतीय आणि अमेरिकन दूतावसाजवळ बॉम्ब हल्ला करण्यात आलाय. यानंतर इथं भीतीचं वातावरण पसरलंय. या भागांत चीनी नागरिक व्हिजासाठी अर्ज दाखल करायला दाखल होतात.
रात्री उशीरा एक वाजल्याच्या दरम्यान हा हल्ला करण्यात आलाय. अनेकांनी या बॉम्बहल्ल्याचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत. परंतु, हा कमी तीव्रतेचा स्फोट असल्याचंही समजतंय.
पूर्वेत्तर बीजिंगस्थित अमेरिकन दूतावास सर्वात सुरक्षित स्थळांपैंकी एक मानलं जातं. २००८ साली हे दूतावास सुरू करण्यात आलं होतं. इथून जवळच भारतीय दूतावासही आहे. हे दोन्ही दूतावास चाओयांग जिल्ह्याजवळ आहे. या हल्ल्यात कुणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही.
या हल्ल्यानंतर एका संशयित महिलेला अटक करण्यात आलीय. या हल्ल्यानंतर महिलेनं स्वत:वर रॉकेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला होता.