कराची : Bomb Blast in Karachi: पाकिस्तानमधील कराचीत बॉम्बस्फोट झाला. खारदार भागातील बॉम्बे मार्केटमध्ये सोमवारी संध्याकाळी हा स्फोट झाला. या स्फोटात एक महिला ठार झाली. भीषण स्फोटानंतर पोलीस आणि बचाव अधिकारी घटनास्थळी रवाना झाले आहेत. या स्फोटानंतर मोठी आग लागली. ही आग विझवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खारदार भागातील बॉम्बे मार्केटमध्ये सोमवारी संध्याकाळी स्फोट झाला, ज्यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला. त्याचवेळी 10 जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जखमींना मदत करण्यासाठी पोलीस आणि बचाव अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्फोटाचे कारण शोधत आहेत. स्फोट झालेले ठिकाणचा परिसर दाट लोकवस्तीचा आहे. कराचीचे प्रशासक मुर्तझा वहाब यांनी सांगितले की, किमान सहा जणांना जखमी अवस्थेत जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. मात्र, ही संख्या वाढू शकते, असे त्यांनी सांगितले. स्फोटाचे नेमके कारण समजू शकलेले नाही


हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांनी नंतर दुजोरा दिला की त्यांना एका महिलेचा मृतदेह सापडला होता तर 10 जण जखमी अवस्थेत आणले होते. स्फोटाचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही, परंतु स्थानिक लोकांचे म्हणणे आहे की हा स्फोट एखाद्या स्फोटक उपकरणामुळे झाला असावा. सिंधचे माहिती मंत्री शर्जील मेमन यांनी सांगितले की, त्यांनी घटनास्थळी पोलिसांची कुमक पाठवली आहे. पोलिसांचा  फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आहे.