Girlfriend Boyfriend Viral Video : Afriend in need is a friend indeed! संकटकाळी आणि गरजेच्या वेळी जो उभा असतो, तो खरा मित्र...असं म्हणतात की संकटात कळतं कोण आपला खरा मित्र आहे ते...सोशल मीडियावर दोस्ती यारीवर अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. प्रियकर आणि प्रेयसीमधील नातं पण मैत्री, विश्वासावर असतं. प्रियसीला कायम वाटतं संकट काळात प्रियकर आपली रक्षा करणार. पण सध्या सोशल मीडियावर एका गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंडचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. ज्या प्रेयसी संकटात असताना प्रियकराचं कृत्य पाहून सगळ्यांना धक्का बसतो. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बायको किंवा प्रेयसी संकटात असल्यावर पहिले नवरा किंवा बॉयफ्रेंड मदतीला जातो. मात्र या व्हिडीओमध्ये प्रियकराचं कृत्य सगळ्यांना आश्चर्यचकित करुन सोडत आहे. व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता रात्रीच्या अंधारात रस्त्यावरून गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड आनंदाने गप्पा मारत जात असतात. अचानक मागच्या बाजूने बाइकवर चोरटे येतात. (Boyfriend leaves girlfriend alone while she gets robbed at gunpoint  boy ran away video viral on social media trending)


अन् त्या दोघांच्या समोर येऊन उभे होतात. बाइकवरील मागे बसलेला चोरटा बंदुकीच्या धाकावर तरुणीकडून पैसे लुटतो. या संकटात मात्र प्रियकर उलट्या पावली तिथून पळून जातो. हो प्रेयसीला संकटात सोडून बॉयफ्रेंड फरार होतो. जेव्हा तरुणी मागे वळून बघते तर तिला प्रियकर दिसत नाही. तिला धक्का बसतो. 


व्हायरल होत असलेला व्हिडीओ सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येतं आहे. हा व्हिडीओ @TheFigen_ नावाच्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून नेटकरी प्रियकरावर टीका करत आहेत. 



हा व्हिडीओ नेटकऱ्यांना थक्क करत आहे. प्रियकराचं कृत हे आक्षेपार्ह आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 63 हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.


 


हेसुद्धा वाचा - Viral Video : पंतप्रधान मोदींना भुरळ घालणाऱ्या 'या' चिमुकलीचं सुमधूर गायन तुम्ही ऐकलं का?


 


नेटकऱ्यांनी अशा मित्रांपासून सावध राहण्याचा सल्ला दिला आहे.