Girl Viral Video : आपल्याकडे एक म्हण आहे लहान बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात. याचा अर्थ असा की, लहान मुलांचे गुण अगदी कमी वयात दिसायला लागतात. टीव्हीवर अनेक असे शो आहेत जिथे लहान मुलांच्या कलागुणांना वाव दिला जातो. या शोमधून अनेक बाल कलाकार जगासमोर येतात. आताचा जमाना हा सोशल मीडियाचा आहे. आई वडील अगदी जन्मलेल्या बाळाचे व्हिडीओदेखील सोशल मीडियावर टाकतात. त्यानंतर त्या बाळाचे अनेक गोष्टींचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले जातात.
गेल्या काही वर्षांपासून आई वडील मुलांच्या अभ्यासासोबतच इतर कलागुणांकडे विशेष लक्ष दिलं जातं आहे. नृत्य, संगीत आणि क्रीडा या सारख्या इतर अॅक्टिव्हिटी वाढल्या आहेत. लहानपणापासूनच एखादी गोष्ट मुलांना यावी असा आग्रह आई वडिलांचा दिसून येतो. (Viral video little girl singing and playing harmonium PM modi Share video on social media trending now)
सोशल मीडियावर एका चिमुकलीने नेटकऱ्यांसोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींना वेड लावलं आहे. या व्हिडीओमध्ये एक चिमुकली आईसोबत कन्नड भाषेमध्ये कवितेचे सुरमयी गायन करत आहे. प्रसिद्ध कवी के. एस. नृसिंग स्वामी यांची ही कविता आहे. पल्लवागाला पल्लवीयाली या कवितेचं गायण करत असतानाचा व्हिडीओ खुद्ध पंतप्रधान मोदींनी शेअर केला आहे.
Listened to this so many times..What an inborn talent..
Source:Wa . pic.twitter.com/bm1LEY4Nn4— Ananth Kumar (@anantkkumar) April 19, 2023
हा व्हिडीओ ट्वीटरवर Ananth Kumar @anantkkumar या अकाऊंटवर शेअर करण्यात आला. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.
This video can bring a smile on everyone’s face. Exceptional talent and creativity. Best wishes to Shalmalee! https://t.co/KvxJPJepQ4
— Narendra Modi (@narendramodi) April 25, 2023
हा व्हिडीओ शेअर करताना ते म्हणाले की, ''हा व्हिडिओ प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू आणू शकतो. असामान्य प्रतिभा आणि सर्जनशीलता. शाल्मलीला खूप खूप शुभेच्छा'' असं पंतप्रधानांनी लिहिलंय.