चीन : तुम्ही कधी विचार केला आहे की, तुमचे आई - वडील तुम्हाला गर्लफ्रेंड नाहीये म्हणून तुम्हाला ओरडतायत? आपल्या भारतात असं होणं शक्य नाही. मात्र चीनमध्ये घडते. अशावेळी आईवडील ओरडू नये म्हणून तरुण रेंटची गर्लफ्रेंड घेऊन त्यांच्या पालकांना भेटतात. चीनमध्ये यासाठी अनेक अॅप्स आहेत, ज्याच्या मदतीने गर्लफ्रेंड रेंटने घेता येतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बहुतेक चीनचे तरुण सुट्टीसाठी त्यांच्या घरी गेल्यावर गर्लफ्रेंडला रेंटवर हायर करतात. असं न केल्यास त्यांना त्यांचे पालक आणि नातेवाईकांच्या कडक प्रश्नांना सामोरं जावं लागतं. कित्येकदा तरुणांना लग्नाचे महत्त्व आणि गर्लफ्रेंड या विषयावर खूप लेक्चर देखील ऐकावी लागतात.


रेंटवर मिळणाऱ्या गर्लफ्रेंड्सच्या या असतात अटी


रेंटवर गर्लफ्रेंड्स असण्याची अट अशी आहे की मैत्रीण भाड्याने घेणारी व्यक्ती मुलीला स्पर्श करू शकत नाही. मुलगी त्या व्यक्तीला भावनिक आधार देईल, त्याच्या मैत्रिणीप्रमाणे वागेल.


माहितीनुसार, गर्लफ्रेंड भाड्याने घेण्यासाठी, मुलांना 1,999 युआन म्हणजेच सुमारे 22,816 रुपये खर्च करावे लागतात. मग ते भाड्याने घेतलेल्या मैत्रिणीला त्यांच्या कुटुंबाशी भेटवू शकतात. मुलं त्याच्यासोबत डेटवर जाऊ शकतात आणि त्यांच्याशी गप्पाही मारू शकतात.


चीनमध्ये लूनर न्यू ईयर दरम्यान, गर्लफ्रेंड रेंटवर घेणं अधिक महाग होतं. मग युवकांना 3 हजार युआन म्हणजेच 34,241 ते 10 हजार युआन म्हणजेच भाड्याने घेतलेल्या गर्लफ्रेंडसाठी 1,14,139 रुपये खर्च करावे लागतात. 


दरम्यान रेंटवर गर्लफ्रेंड म्हणून काम करणाऱ्या मुलीने सांगितलं की, तिची नोकरी खूप कठीण आहे कारण तिला प्रत्येक वेळी अनोळखी व्यक्तीची मैत्री करावी लागते.