नवी दिल्ली : ब्राझीलच्या (Brazil) आरोग्य विभागाने हैदराबादस्थित भारत बायोटेक (Bharat Biotech)येथील कोरोना लस (Covaxin) आयात करण्यास नकार दिला आहे. जीएमपी (Good Manufacturing Pracctice) नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ब्राझीलने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येतंय.


ब्राझीलची 2 कोटी डोसची मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्राझील सरकारने (Brazil Govt)गेल्या महिन्यात भारतीय औषध उत्पादकांकडे 2 कोटी डोस खरेदी करण्याच्या करारावर सही केली. भारत बायोटेकने (Bharat Biotech)8 मार्च रोजी ब्राझीलमध्ये लसीच्या तातडीच्या वापरासाठी अर्ज केला.



भारत बायोटेकची प्रतिक्रिया 


लस उत्पादनाच्या चांगल्या उत्पादनाचे नियम पाळले गेले नाही, ज्यामुळे कोवाक्सिनला आयात करण्यास मान्यता मिळाली नाही असे ब्राझील सरकारने जारी केलेल्या राजपत्रात असे म्हटले आहे. यावर लस निर्माता भारत बायोटेकची प्रतिक्रिया समोर आली आहे. या विषयावर ब्राझीलशी चर्चा सुरू आहे.तपासणी दरम्यान नमूद केलेल्या आवश्यकता पूर्ण केल्या जातील असे सांगण्यात आले.


भारतासह 5 देशात परवानगी


भारत बायोटेक आणि ब्राझीलमधील सहाय्यक कंपनी प्रिझिका मेडिसमेंटोस यांनी एक निवेदन जारी केले. ब्राझिलियन हेल्थ रेग्युलेटर (आरोग्य नियामक) च्या या निर्णयाबाबत आम्ही पुरावे सादर करू, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनी कोवॅक्सिनचे प्रत्येक नियम पाळत आहे आणि त्याचा वापर करण्याची परवानही भारतासह पाच देशांमध्ये मिळाली असल्याचेही म्हटलंय.