मुंबई : कोरोना साथीच्या रोगाविरूद्ध लसीकरण मोहीम लवकरच भारतात सुरू केली जात आहे. अ‍ॅस्ट्रॉजेनेका आणि भारत बायोटेक निर्मित कोरोना लस वापरण्यास भारतात मान्यता देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जायर बोलसोनारों यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आवाहन केले आहे. कोरोनावरील लस लवकरात लवकर ब्राझीलला पाठवावी, जेणेकरून ब्राझीलमध्ये लसीकरण सुरू करता येईल अशी विनंती बोलसोनारो यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे पत्र बोलसोनारो यांच्या कार्यालयाने जारी केले आहे. जगातील कोरोना बाधित देशांच्या यादीत ब्राझील दुसर्‍या क्रमांकावर आहे. अशा परिस्थितीत ब्राझीलमध्ये लसीकरणाला उशीर झाल्यामुळे ब्राझीलवरील दबाव वाढत आहे. अशा परिस्थितीत जनता व विरोधी पक्षाकडून सरकारवर दबाव आणत आहे.


बोलसोनारो यांनी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात असे लिहिले आहे की, भारतीय लसीकरण मोहिमेला धक्का न लागता आमच्या देशात ही लसीकरण कार्यक्रम सुरू करण्यासाठी आम्हाला २० लाख कोरोना लस लवकरात लवकर पाठवण्यात यावे.


जगातील सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे अमेरिकेत होते. त्यानंतर ब्राझील आणि मग भारताचा क्रमांक होता. पण हळूहळू भारतात कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आणि भारतात ब्राझील पेक्षाही अधिक रुग्ण वाढले. पण भारतात आता रुग्णांची संख्या कमी होत आहे.