मुंबई : लग्न हे कोणत्याही जाती-धर्मातील लोकांसाठी अत्यंत महत्वाचं आणि खास असतं. लग्न आणखी खास बनवण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या परंपरा चालवल्या जातात. मात्र काही पद्धती या वेगळ्याच असतात. एका ठिकाणी अशी हटके पद्धत आहे. जिथे नवं दाम्पत्य लग्नानंतर 3 दिवस टॉयलेटला जाऊ शकत नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

द स्टार रिपोर्टनुसार, लग्नानंतर एक हटकेच पद्धत या ठिकाणी चालवली जाते. इंडोनेशियाच्या टीडॉन्ग नावाच्या समुदायात ही पद्धत आहे. या परंपरेबाबत अनेकजण सहमत आहेत. त्यामुळे लोक या परंपरेला फॉलो करतात. लग्नानंतर तब्बल 3 दिवस नववधु आणि नवरदेव टॉयलेटला जात नाहीत. 


टॉयलेटला न जाण्यामागचं कारण धक्कादायक


या पद्धतीमागे असा विचार असतो की,'लग्न हे पवित्र असतं. जर नवं दाम्पत्य टॉयलेटला गेलं तर ती पवित्रता भंग होते. आणि ते अशुद्ध होतात. यामुळे नवं दाम्पत्याच्या टॉयलेटला जाण्यावर बंधन असतं. धक्कादायक म्हणजे असं कुणी केलं तर ते अपशकुन असतं असं म्हटलं जातं.'


वाईट नजरेपासून वाचण्यासाठी 


एवढंच नाही तर यामागे दुसरं कारण देखील आहे. नवविवाहित जोडप्याला कुणाची नजर लागू नये म्हणून देखील ही पद्धत केली जाते. या जातीच्या लोकांची मान्यता मिळाली असून त्यांच्या म्हणण्यानुसार, टॉयलेट ही घाणेरडी जागा आहे. तसेच टॉयलेटमध्ये नकारात्मक शक्ती असते. 


नात्यात येतो दुरावा 


असा समज आहे की, नववधु, नवरदेव लग्नानंतर लगेच शौच्छालयात गेले तर त्यांच्यावर नकारात्मक शक्तींचा प्रभाव पडतो. यामुळे नवीन जोडप्याच्या आयुष्यात संकट येतात. नात्यात अंतर निर्माण होतं. नवविवाहित जोडप्याचं लग्न तुटू देखील शकते. 


लग्नानंतर कमी दिलं जातं जेवण 


लग्नाच्या तीन दिवसांपर्यंत नववधू आणि नववराला कोणताही त्रास दिला जात नाही. एवढंच नव्हे तर नवं दाम्पत्याला त्रास होऊ नये म्हणून खायला देखील कमी दिलं जातं. एवढंच नव्हे तर त्यांच्या खाण्यापिण्याकडे खास लक्ष दिलं जातं. अनेक ठिकाणी ही पद्धत अतिशय कठोरपणे पाळली जाते.