लग्नाआधी केलेली Breast Surgery जीवावर बेतली! 21 वर्षीय तरुणीचा मृत्यू; सर्जरीनंतर...
Breast Surgery Bride To Be Died: तिच्या मृत्यूची बातमी समोर आल्यानंतर घरच्यांना मोठा धक्का बसला आहे. तिने हा सारा प्रकार करु नये अशी तिच्या घरच्यांबरोबरच होणाऱ्या नवऱ्याचीही इच्छा होती.
Breast Surgery Bride To Be Died: लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील फार खास गोष्ट असते त्यामुळेच आपलं लग्न कायमचं लक्षात रहावं म्हणून वेगवेगळे प्रयत्न करत असतात. काहींना अगदी कमी बजेटमध्ये आलीशान लग्न करायचं असतं तर काहींना अगदी साध्या पद्धतीने जवळच्या व्यक्तींमध्ये लग्न करायचं असतं. लग्न कसंही केलं तरी ते कायम लक्षात रहावं अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र लग्नासंदर्भात असलेल्या कल्पना आणि इच्छा पूर्ण करण्याच्या नादात कधीतरी जीव धोक्यात टाकल्याचे प्रकारही घडतात. असाच काहीसा प्रकार अमेरिकेमध्ये घडला आहे.
21 वर्षीय तरुणीचा मृत्यू
पूर्वी आपल्या लग्नासंदर्भात तरुणी एवढ्या सक्रीयपणे सहभागी होत नसतं. अर्थात पूर्वी लग्नासंदर्भातील एवढे पर्यायही उपलब्ध नसल्याने पारंपारिक पद्धतीने लग्नं लावली जायची. हल्ली मात्र अगदी थीमवर आधारित लग्न, प्री वेडिंग फोटशूट, रिसेप्शन यासारख्या बऱ्याच नवीन संकल्पना लग्नसहोळ्याचा अविभाज्य भाग झाल्या आहेत. अगदी लग्नाच्या कपड्यांपासून ते लूकपर्यंतचे निर्णयही वर आणि वधूच घेतात. मात्र अमेरिकेतील 21 वर्षीय एलिसिया नेबोसो नावाच्या तरुणीची लग्नासंदर्भातील अशीच एक फॅण्टसी जीवावर बेतली आहे.
होणाऱ्या नवऱ्याचाही होता विरोध
आपला ब्राइडल गाउन अगदी फीट बसावा अशी एलिसिया नेबोसोलाची इच्छा होती. यासाठी एलिसिया नेबोसोने आपल्या स्तनांची शस्रक्रीया केली. तिने शस्रक्रीयेच्या माध्यमातून आपल्या स्तनांचा आकार वाढवून घेतला. एलिसिया नेबोसोला आपल्या लग्नामध्ये लो कट ड्रेस परिधान करायचा होता. लोकांची नजर आपल्यावरुन हटू नये अशी एलिसिया नेबोसोची इच्छा होती. एलिसिया नेबोसो कायमच तिच्या दिसण्याबद्दल फार सतर्क असायची. त्यामुळेच तिने ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरी केल्याची माहिती तिच्या मैत्रिणीने 'न्यूयॉर्क पोस्ट'ने दिली आहे. एलिसिया नेबोसोच्या होणाऱ्या नवऱ्यालाही तिने स्तनांचा आकार वाढवण्यासाठीची ही शस्रक्रीया करुन घेणं पटलं नव्हतं. मात्र एलिसिया नेबोसोने कोणाचेही ऐकलं नाही.
ब्रेस्ट इम्प्लांट सर्जरीनंतर नेमकं तिच्याबरोबर घडलं काय?
एलिसिया नेबोसोने 11 सप्टेंबर रोजी इटलीमधील एका क्लीनिकमध्ये सर्जरी केली. त्याच दिवशी या तरुणीला डिस्चार्जही दिला. 18 सप्टेंबरपर्यंत सर्व काही सुरळीत सुरु होतं. मात्र नंतर एलिसिया नेबोसोला ताप, थकवा, खोकला आणि अशक्तपणा जाणवू लागला. तसेच एलिसिया नेबोसोला पचनासंदर्भातील समस्या म्हणजेच गॅस्ट्रोइंटेस्टिनल समस्याही जाणवू लागल्या. 20 सप्टेंबर रोजी एलिसिया नेबोसोची प्रकृती फारच बिघडली. रक्तामधील पांढऱ्या रक्त पेशी कमी होऊ लागल्यानंतर अचानक अस्वस्थ वाटत असतानाच एलिसिया नेबोसोचा हृदयविकाराचा झटका आला. यातच एलिसिया नेबोसोचा मृत्यू झाला. ज्या ड्रेससाठी एलिसिया नेबोसोने एवढे प्रयत्न करुन अगदी स्वत:चा जीव गमावला तो ड्रेसही तिला परिधान करता आला नाही. एलिसिया नेबोसोच्या आकस्मीक मृत्यूने तिच्या घरच्यांना मानसिक धक्का बसला आहे.