Queen Elizabeth II Income and NetWorth : ब्रिटनची राणी एलिझाबेथ II आता या जगात नाहीत. काल त्यांचे वयाच्या 96  व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतरी त्यांच्याबद्दल अनेक बातम्या येत आहेत. कधी त्यांच्या सात दशकापर्यंत राज करण्याची गोष्ट सांगितली जात आहे. कधी त्यांच्या वैयक्तिक गोष्टींबाबत चर्चा होत आहे. त्यांचे वक्तिमत्व कसे होते. तर त्यांचे दुसऱ्या देशातही साम्राज्याबाबत. मात्र, आता त्यांच्या मृत्यूनंतर त्यांची संपत्तीबाबत माहिती पुढे आली आहे. ही संपत्ती त्यांची एवढी कशी झाली. त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत काय होते, याबद्दलही अनेकांना उत्सुकता आहे. त्या 14 देशांच्या राणी होत्या. या शाही कुटुंबाबद्दल माहिती जाणून घेण्यात येत असते. आता तर त्यांची संतप्ती किती आणि तिच्या उत्पन्नाचा स्त्रोत काय, याची अनेकांना उत्सुकता आहे. आज आम्ही तुम्हाला सविस्तर सांगतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाबा वेंगा नाही तर राणी Elizabeth II यांच्या मृत्यूबद्दलची यांची ही भविष्यवाणी ठरली खरी!


 अंदाजे उत्पन्न खूप जास्त   


जरी राणी एलिझाबेथ II (Queen Elizabeth II ) किंवा राजघराण्यातील इतर कोणत्याही सदस्याने कधीही उत्पन्न किंवा संपत्तीबद्दल सांगितले नाही. परंतु वेगवेगळ्या अहवालांमध्ये निश्चितपणे चर्चा केली गेली आहे. गुडटू वेबसाइटनुसार, 2022 मध्ये, राणी एलिझाबेथ II यांची अंदाजे एकूण संपत्ती 365 दशलक्ष पौंड किंवा 33.36 अरब  रुपयांपेक्षा जास्त होती. त्याचवेळी, संडे टाइम्सच्या श्रीमंतांच्या यादीनुसार, 2020 मध्ये राणी एलिझाबेथ II यांची एकूण संपत्ती  15 मिलियन पाउंड अधिक होती. फोर्ब्स मासिकानुसार, संपूर्ण राजघराण्याची एकूण संपत्ती 72.5 बिलियन पाउंड किंवा  6,631 अरब रुपयांपेक्षा जास्त आहे.


या ठिकाणांहून होत आहे कमाई


राणीच्या उत्पन्नाच्या मुख्य स्त्रोतांबद्दल, तिला सरकारकडून दरवर्षी सार्वभौम अनुदान मिळत असे, तर इतर दोन स्रोत स्वतंत्र होते ( राणीचे वैयक्तिक उत्पन्न आहे) ज्यात करदात्यांच्या पैशांचा समावेश नव्हता. लंडनशिवाय स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंडमध्येही राजघराण्याची मालमत्ता आहे. ही राणीची वैयक्तिक मालमत्ता आहे. जी विकली जाऊ शकत नाही, परंतु ती तिच्या वारसांना दिली जाईल.


रॉयल कलेक्शनमध्ये 10 लाख अधिक वस्तूंचा समावेश 


याशिवाय राणीच्या मालमत्तेमध्ये अनेक मौल्यवान कलाकृती, हिरे आणि दागिने, आलिशान कार, रॉयल स्टॅम्प कलेक्शन आणि घोडे यांचा समावेश आहे. रॉयल कलेक्शनमध्ये 10 लाखांहून अधिक वस्तूंचा समावेश आहे. ज्याची अंदाजे किंमत 10 ट्रिलियन रुपये आहे. ही मालमत्ता यूके ट्रस्टकडे आहे. ब्रिटनचे नवे राजे किंग चार्ल्स यांच्या वार्षिक उत्पन्नाबद्दल सांगायचे तर, त्यांना Duchy of Cornwall कडून दरवर्षी सुमारे 21 दशलक्ष पौंडचे उत्पन्न मिळते.