वॉशिंग्टन : ब्रिटनच्या राजघराण्याची मान एका अतिशय गंभीर आणि तितक्याच वादग्रस्त प्रकरणामुळं खाली गेली आहे. राजकुमार अँड्र्यू यांच्या समोर असणाऱ्या अडचणी यामुळं पुन्हा एकदा वाढल्या आहेत. न्यायालयात त्यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला खटला रद्द करण्यास न्यायालयानं स्पष्ट नकार दिला आहे. परिणामी त्यांना आता या सुनावणी प्रक्रियेला सामोरं जावं लागणार आहे. (Prince Andrew )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूयॉर्कच्या फेडरल कोर्टमधील न्यायाधिशांनी निर्णय देत वर्जीनिया गिफ्रेद्वारा दाखल करण्यात आलेला खटला रद्द होऊ शकत नाही, ज्यामुळं राजकुमार अँड्र्यू यांना सदर प्रकरणाला सामोरं जावं लागेल असं म्हटलं. 


अस्पष्ट काहीच नाही.... 
CNN च्या वृत्तानुसार ब्रिटनच्या राजघराण्याचे सदस्य (British Royal Family)आणि ड्यूक ऑफ यॉर्क प्रिन्स अँड्र्यू यांनी वर्जीनियाच्या याचिकेत काहीच अस्पष्ट नसल्याचं मत नोंदवलं. 


परिणामी हा खटला रद्द होई शकत नसल्याचं कारण त्यांनी पुढे केलं. 


सूत्रांच्या माहितीनुसार गिफ्रे अवघ्या 17 वर्षांची असताना प्रिन्स अँड्र्यू यांनी तिचं लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिनं केला होता. 


Prince Andrew वर हे आरोप 
ऑगस्ट महिन्यात Prince Andrew यांच्यावर वर्जीनिया गिफ्रेनं काही गंभीर आरोप केले होते. 


2001 मध्ये फायनांसर जेफरी एपस्टीनच्या मदतीनं प्रिन्सनं तिचं लैंगिक शोषण केलं होतं. 


याचिकेत म्हटल्यानुसार आपण अल्पवयीन असल्याची कल्पना प्रिन्सना होती असं गिफ्रेनं म्हटलं आहे. 


प्रिन्सनं तीन विविध जागांवर म्हणजेच, यूएस वर्जिन आइलँड्स मध्ये एपस्टीनच्या खासगी बेटावर, मॅनहॅटनमध्ये त्यांच्या राजवाड्यात आणि लंडनमध्ये एक्स गर्लफ्रेंडच्या घरी माझं शोषण केलं होतं. 


असं म्हटलं जातं की, लैंगिक शोषणासाठी महिलांची तस्करी करणाऱ्या 66 वर्षीय एपस्टीननं 2019 मध्ये मॅनहॅटन येथे आत्महत्या केली होती. 



आपल्यावरी आरोप तथ्यहीन असल्याचं सांगत प्रिन्सनं याचिका रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केली होती. 


पण, त्यांची ही मागणी न्यायव्यवस्थेनं फेटाळली आहे ज्यामुळं आता या प्रकरणी काय सुनावणी होते हे पाहणं महत्त्वाचं असेल.