ब्रिटनमध्ये (Britan) एका शिक्षकाचे (Teacher) लाजिरवाणे कृत्य समोर आले आहे. ऑनलाइन (Online) शिकवत असताना शिक्षकाने पॉर्न वेबसाइटला (Porn site) 74 वेळा भेट दिली होती. ही बाब गेल्या वर्षीच्या फेब्रुवारी ते मार्च महिन्यातील आहे. मात्र या प्रकरणाच्या शिस्तभंगाच्या सुनावणीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनमधील 'मेडस्टोन ग्रामर स्कूल'मधून (maidstone grammar school) डेव्हिड चिडलो (David Chidlow) या शिक्षकाला (teacher) बडतर्फ करण्यात आले आहे. त्याच्याविरुद्ध केलेल्या चौकशीत तो वर्गात पॉर्न वेबसाइट (Porn site) पाहत असे. 59 वर्षीय डेव्हिड 2018 पासून शाळेत काम करत होता. डेव्हिड ((David Chidlow) ए लेव्हल आणि जीसीएसई विद्यार्थ्यांना अर्थशास्त्र शिकवत होता. (Teacher Watching Adult Sites)


सुनावणीदरम्यान, डेव्हिडने कबूल केले की मायक्रोसॉफ्ट टीम्सवर (Microsoft Teams) विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिकवताना त्याने वारंवार विंडो बदलल्या आणि पॉर्न साइट पाहिली होती. मुलांना शिकवताना तो 'चॅटिंग' करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. हे सर्व केल्यानंतर त्याने इंटरनेट हिस्ट्री डिलीट करण्याचाही प्रयत्न केला.


डेव्हिडनेही या प्रकरणी लेखी निवेदन दिले असून, त्याचे वर्तन कोणत्याही प्रकारे स्वीकारता येणार नाही, असे कबूल केले. त्यामुळे शिक्षणासारख्या व्यवसायाची बदनामी झाली आहे.


फेब्रुवारी 2021 मध्ये, शाळेच्या मॉनिटरिंग सॉफ्टवेअरने 'आय टेक माय लाईफ' हा कीवर्ड वापरल्याचे उघड झाले. त्यानंतरच या प्रकरणाचा तपास सुरू झाला. यानंतर डेव्हिडने 'एस्कॉर्ट सर्व्हिस वेबसाइट'वर अनेक वेळा क्लिक केल्याचे समोर आले. त्याने शाळेच्या लॅपटॉपमध्येच अनेक महिलांचे फोटो सेव्ह केल्याचेही समोर आले. या महिलांशी तो ईमेलद्वारे चॅटिंग करत असे, असेही डेव्हिडने कबूल केले. तो महिलांकडे त्यांचे फोटोही मागात असे.


डेव्हिड विद्यार्थ्यांसोबत अश्लील साहित्य सहज शेअर करू शकतो. त्यांच्या या वागणुकीमुळे त्यांना शिकवण्यावर बंदी घालावी, अशी शिफारस समितीने राज्य सचिवांकडे केली होती. यानंतर शिक्षण सचिवांनी शिक्षकावर आजीवन अध्यापनावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.