लंडन: इंग्लडमधील एका 21 वर्षीय तरुणाने मुलीला जन्म दिला आहे. त्या पुरुषाचे नाव हायडेन क्रॉस असे आहे.. तो स्त्री म्हणून जन्माला आला होता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तीन वर्षापूर्वी त्यानं लिंग परिवर्तन केलं आणि पुरुष बनला. हायडेन क्रॉसने 16 जून रोजी मुलीला जन्म दिला. लिंग परिवर्तन करून घेऊन गरोदर राहिलेला हा इंग्लडमधील पहिला पुरूष आहे. 


ग्लॉस्टेरशायरमधील रॉयल हॉस्पिटलमध्ये त्यानं मुलीला जन्म दिला. हायडेन क्रॉस यांनी फेसबुकद्वारे वीर्यदाता मिळवल्यावर त्याना गर्भधारणा झाली. यावर्षी जानेवारी महिन्यात क्रॉस यानं मी गरोदर आहे असे जाहीर केले होते.