लंडन : ऋषी सुनक (PM Rishi Sunak) यांनी ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेताच अनेक जुन्या मंत्र्यांची हकालपट्टी केलीये. ऋषी सुनक यांनी आधीच याबाबतचे संकेत दिले होते. जुन्या लोकांनी केलेल्या चुका सुधारण्यासाठी आपली निवड झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. किंग चार्ल्स II यांची भेट घेतल्यानंतर तासाभरातच ते कामाला लागले. सर्वात प्रथम त्यांनी काही मंत्र्यांची हकालपट्टी  केलीये.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांच्या मंत्रिमंडळातील अनेक सदस्यांना नवीन मंत्रिमंडळाच्या घोषणेपूर्वी राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे. आतापर्यंत तीन मंत्र्यांना पायउतार होण्यास सांगण्यात आले आहे. यामध्ये बिझनेस सेक्रेटरी जेकब रीस-मोग, जस्टिस सेक्रेटरी ब्रँडन लुईस आणि डेव्हलपमेंट मिनिस्टर विकी फोर्ड यांचा समावेश आहे. जेरेमी हंट मात्र अर्थमंत्री म्हणून कायम राहणार आहेत.


किंग चार्ल्स III यांची भेट घेतल्यानंतर सुनक यांनी भारतीय वंशाचे पहिले ब्रिटिश पंतप्रधान म्हणून औपचारिकपणे पदभार स्वीकारला. ब्रिटनचे माजी अर्थमंत्री ऋषी सुनक (४२) हे हिंदू आहेत आणि ते गेल्या २१० वर्षांतील ब्रिटनचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत.


पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या 10 डाउनिंग स्ट्रीटच्या बाहेर, ऋषी सुनक म्हणाले की, 'ते गंभीर आर्थिक संकटाला सहानुभूतीपूर्वक सामोरे जाणार आहेत. प्रामाणिक, व्यावसायिक आणि जबाबदार" सरकारचे ते नेतृत्व करतील. माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी केलेल्या "चुका सुधारण्यासाठी" कंझर्व्हेटिव्ह पक्षाचा नेता आणि पंतप्रधान म्हणून माझी निवड झाली आहे.'


मंत्रिपदाच्या कार्यकाळात 'फर्लो' सारख्या योजनांद्वारे "सामान्य माणसाचे रक्षण करण्यासाठी" जे काही करता येईल ते केले. आज आपल्यासमोर जी आव्हाने आहेत. त्यांचा सामना करण्याचा मी प्रयत्न करेन.'