Coronavirus: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रूग्णालयातून डिस्चार्ज
बोरिन जॉन्सन यांना झाली होती कोरोनाची लागण
मुंबई : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना रविवारी डिस्चार्ज मिळाला. डाउनिंग स्ट्रीटचे प्रवक्तांनी याबाबत माहिती दिली. कोरोना व्हायरसमुळे बोरिस एका आठवड्यापासून रूग्णालयात दाखल होते. एवढंच नव्हे तर त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे आयसीयूत दाखल करण्यात आलं होतं. या अगोदर त्यांनी डाउनिंग स्ट्रीटमध्ये स्वतःला सेल्फ आयसोलेशन देखील केलं होतं आणि तेथूनच ते काम करत होते.
तीन दिवस आयसीयूत राहिल्यानंतर गुरूवारी त्यांना जनरल वॉर्डमध्ये ठेवण्यात आलं. डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते घरातून आपलं काम करणार आहेत. डाउनिंग स्ट्रीटच्या प्रवक्तांनी सांगितलं की, मेडिकल टिमच्या सल्ल्यानुसार बोरिस लगेच कामाला सुरूवात करणार नाही.
आयसीयूतून बाहेर आल्यावर त्यांनी सगळ्यांचे आभार मानले. फक्त आभार माननं पुरेसं नाही मी त्यांचा ऋणी आहे. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
पंतप्रधानांची गर्लफ्रेंड कॅरी साइमंड्स गरोदर असून त्यांनी तिला पत्र पाठवले की, आपल्या बाळाचं स्कॅनिंग करून घे. जेणेकरून मी रूग्णालयात शांतपणे राहू शकतो. बोरिस यांच्या चाहत्यांना 'गेट वेल सून' कार्ड देखील पाठवले. कोरोना व्हायरसमुळे ९,८७५ लोकांचा मृत्यू झाला असून ७८,९९१ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे.
२७ मार्ज रोजी बोरिस जॉन्सन यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिली होती. कोरोनाची लक्षणे आढलल्यामुळे त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. आणि ती टेस्ट पॉझिटीव्ह आली होती.