नवी दिल्ली : ख्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागताची सर्वत्र जोरदार तयारी सुरु आहे. मात्र, ख्रिसमसपूर्वी ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसे मे यांना एक जोरदार झटका बसला आहे.


डॅमियन ग्रीन यांचा राजीनामा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसे मे यांचे निकटवर्तीय आणि फर्स्ट सेक्रेटरी ऑफ स्टेट (उपपंतप्रधान) डॅमियन ग्रीन यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.


आचारसंहितेचं उल्लंघन


हाऊस ऑफ कॉमन्सच्या ऑफिसमधील कम्प्यूटरवर २००८ साली पॉर्न व्हिडिओ पाहिल्याचं चौकशीत स्पष्ट झालं. असं करणं म्हणजे मंत्र्यांसाठी असलेल्या आचारसंहितेचं उल्लंघन आहे. त्यामुळेच त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.


पंतप्रधान थेरेसे मे यांच्यासाठी मोठा झटका


डॅमियन ग्रीन यांचा राजीनामा म्हणजे ब्रिटनचे पंतप्रधान थेरेसे मे यांच्यासाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. 


दरम्यान डॅमियन ग्रीन यांनी आपल्यावरील सर्व आरोप मान्य केले असून आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचं कबूल केलं.


तसेच, २०१५ मध्ये पत्रकार केट मेल्टबी यांच्याशी गैरवर्तन केल्याचा आरोप डॅमियन ग्रीन यांच्यावर होता.