लॉस एंजेलिस : या आगीला 'द थॉमस फायर' असं नाव देण्यात आलं असून ती २,४२,००० एकरांवर पसरलेली आहे. 


इतिहासातली तिसरी मोठी आग


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कॅलिफोर्नियाच्या इतिहासातली तिसरी सर्वात मोठी आगीने अमेरिकेत थैमान घातलय. या आगीत २,४२,००० एकर जमीन आणि ७०० च्यावर घरं भक्षस्थानी पडली आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे या आगीने रौद्र रुप धारण केल होतं. वाऱ्यांमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरली होती. 


प्रचंड नुकसान


या आगीत ९७ मिलियन डॉलर्सचं नुकसान झालय. ही आग विझवण्यासाठी हजारोंच्या संख्येने अग्निशमन दल चोवीस तास प्रयत्न करतायेत. याकामी हेलिकॉप्टर्स आणि विमानांचीसुद्धा मदत घेण्यात आली.


आगीच्या तडाख्यात मोठा भूभाग


लॉस एंजेलिस शहराच्या १६१ किमी वायव्येला लागलेल्या या आगीने बराच मोठा भूभाग आपल्या तडाख्यात घेतला होता. या आगीने जवळपास १८,००० घरांना धोका निर्माण झाला होता. पॅसिफिकच्या कडेकडेने ही आग पसरत चालली आहे. उष्ण सॅन्टा अॅना वाऱ्यांमुळे ही आग मोठ्या प्रमाणावर पसरली. या वाऱ्यांचा वेग ६४ किमी प्रति तास इतका होता.