आता डोळे सांगणार तुमचा मृत्यू केव्हा होणार?
संशोधकांनी एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्रोग्राम विकसित केला आहे.
मेलबर्न : आता तुमचे सांगणार आहेत की, तुमचा मृत्यू केव्हा होणार आहे...हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल, पण आता हे संभव आहे. आता तुमचे डोळे स्कॅन करून तुमचा मृत्यू कधी होणार आहे हे कळू शकणार आहे.
आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीने होणार भविष्यवाणी
WIONच्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियन संशोधकांनी एक नवीन आर्टिफिशियल इंटेलिजेंस प्रोग्राम विकसित केला आहे. हा प्रोग्राम एखाद्या व्यक्तीच्या डोळ्याच्या रेटिनामागील टिश्यू पाहून त्याच्या आयुष्याच्या वर्षांचा अंदाज लावू शकतो.
रेटिनाच्या अभ्यासावर आधारित निष्कर्ष
ब्रिटीश जर्नल ऑफ ऑप्थाल्मोलॉजीमध्ये बुधवारी प्रकाशित झालेला एक रिपोर्ट रेटिनाच्या अभ्यासावर आधारित आहेत. यामध्ये शास्त्रज्ञांनी असा दावा केलाय की, डोळयातील रेटिना असं काम करेल ज्यामुळे ते तुमच्या आरोग्याविषयी सखोलपणे जाणून घेऊ शकतील.
मेलबर्नच्या सेंटर फॉर आय रिसर्चच्या संशोधकांनी दावा केला की, आर्टिफिशियल इंटेलिजेंस अल्गोरिदमने जवळपास 19,000 फंड्स स्कॅनचं विश्लेषण केल्यानंतर रेटिनाच्या वयाचा अचूक अंदाज लावला.
मेलबर्न युनिवर्सिटीतील या संशोधनाच्या अभ्यासाचे लेखक डॉ मिंगगुआंग लिहितात, एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूची भविष्यवाणी करण्यात डोळयातील रेटिना नक्कीच उपयुक्त ठरेल.