मुंबई : सोशल मीडियावर अनेक फोटो व्हायरल होत असतात, जे लोकांना विचार करायला भाग पाडतात. सध्या असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जो सर्वांना विचार करायला भाग पाडत आहे. या फोटोमध्ये काही अंकांशी रिलेटेड कोडं समोर आलं आहे. जे भल्याभल्या लोकांनाही सोडवणं कठीण झालं आहे. तसे पाहाता गणिताचा हा प्रश्न अवघड वाटत असला, तरी हा असा प्रश्न आहे. जो 5 वर्षाच्या मुलालाही सहज सोडवता येईल. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या फोटोमध्ये काही अंक लपलेले आहे आणि त्यांच्यातील कोड्याचं उत्तर आपल्याला शोधून काढायचं आहे.


हा फोटो काळजीपूर्वक पहा आणि विचार करा की, चार अंकी संख्येच्या बरोबरीची एक अंकी संख्या कशी असू शकते. थोडा वेळ फोटो पाहा आणि विचार करा


उत्तर देताना लोकांचा घाम सुटला


तुम्हाला काही उत्तर मिळाले का? जर नसेल तर आम्ही तुम्हाला या चित्रामागील युक्ती सांगतो. 2581=? याप्रश्वाचं उत्तर अगदी सोप्पंय... याचं उत्तर 2 असं आहे.


यामध्ये गणिताचे कोणतेही सूत्र वापरलेले नाही, तर चार अंकी येणाऱ्या संख्यांमध्ये येणाऱ्या शुन्याला तुम्हाला शोधायचं आहे, म्हणजे यामध्ये लपलेल्या गोलाची संख्यं तुम्हाला शोधून काढायची आहे. यानुसार 2581 क्रमांकामध्ये, तुम्ही 8 अंकाला पाहिलात, तर यामध्ये 2 वर्तुळे लपली आहे, म्हणून याचं उत्तर 2 असं आहे.