मर्डर मिस्ट्रीचा अखेर उलगडा, Facebook पोस्टमुळे उलगडलं रहस्य; आरोपी कोण आहे समजल्यानंतर पोलीसही चक्रावले
26 मार्च 2015 रोजी कॅनडामधील सस्केवेशन (Saskatchewan, Canada) येथे एका कारचालकाला एका तरुणीचा मृतदेह आढळला होता. पोलिसांना हत्येचा उलगडा करण्यासाठी तब्बल दोन वर्षं लागली. पण आरोपी कोण आहे हे समजल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला
25 मार्च 2015 ला कॅनडामधील 21 वर्षीय शायन रोज़ एंटोइन (Cheyenne Rose Antoin) आणि तिची खास मैत्रीण ब्रिटनी गार्गल (Brittney Gargol) ने सेल्फी घेऊन फेसबुकवर (Facebook) पोस्ट केला होता. हा फोटो ब्रिटनीच्या फेसबुक अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आला होता. पण पुढे जाऊन या फोटोमुळे कोणाच्या तरी अडचणी वाढणार होत्या.
26 मार्च 2015 रोजी कॅनडामधील सस्केवेशन (Saskatchewan, Canada) येथे एका कारचालकाला एका तरुणीचा मृतदेह आढळला. त्याने तात्काळ पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन तपास केला असता तिच्या गळ्यावर काही जखमा होत्या. तिची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं दिसत होतं. पोलिसांनी मृतदेह तात्काळ शवविच्छेदनासाठी पाठवला.
पोलिसांना सर्वात प्रथम तरुणीची ओळख पटवायची होती. तरुणीच्या शरिरावर खूप टॅटू होते. यामुळे त्यांनी फोटो काढून सोशल मीडियावर शेअर करत तिची ओळख पटवण्याचं आवाहन केलं. पोलिसांच्या अपेक्षेप्रमाणे लगेचच तरुणीची ओळख पटली. यामधील एक शायन होती. तिने पोलिसांना हा मृतदेह आपल्या मैत्रिणीचा असल्याची माहिती दिली.
आपण काल रात्री एकत्र होतो अशी माहिती शायनने पोलिसांना दिली. पोलिसांना तिने सांगितलं की, 25 मार्चला दोघी एका पार्टीत गेलो होतो. तिथून ब्रिटनीचा एका तरुणासह नाइट आऊटचा प्लान झाला आणि त्याच्यासह ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी 26 मार्चला आपण घरी पोहोचली आहे का विचारण्यासाठी फोन केला तर ब्रिटनीने फोन उचलला नाही. आपण तिला फेसबुकवरही मेसेज केला, पण तिथेही काही उत्तर मिळालं नाही.
शायनने पोलिसांना आपली फेसबुक पोस्टही दाखवली. यानंतर पोलिसांनी ब्रिटनी ज्या तरुणासह गेली होती त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण फार प्रयत्न करुनही त्याची माहिती मिळत नव्हती. यामुळे त्यांनी पुन्हा एकदा शायनकडे चौकशीला सुरुवात केली. तेव्हा शाययने सांगितलं की, त्या दोघीही सास्काटून ग्रिल बारमध्ये (Saskatoon Grill Bar) गेल्या होत्या. दोघीही तिथे मद्यसेवन आणि धुम्रपान करत होत्या. लायटर हरवल्याने आपण तिथे उभ्या एका तरुणाकडे मागितलं. त्यानंतरच त्या दोघांमध्ये संवाद सुरु झाला. त्याच तरुणाने ब्रिटनीला सोबत येण्यास सांगितलं आणि ती तयारही झाली.
शायनने ब्रिटनीला आपण एका लाइट हाऊस शेल्टरमध्ये जात असल्याचं सांगितलं होतं. लाइट हाऊस असं ठिकाण आहे जिथे बेघर राहतात. शायनने पोलिसांना सांगितलं की, आपण लाइट हाऊस शेल्टरला गेल्यानंतर काकांची भेट घेऊन पुन्हा घरी आले. ब्रिटनी कुठे गेली याची आपल्याला काही माहिती नाही.
पोलिसांना शायनवर आला संशय
प्राथमिक चौकशीदरम्यान पोलिसांना शायन सगळं काही खरं सांगत असल्याचं वाटत होतं. पण नंतर पोलिसांना शायनवर संशय येऊ लागला. म्हणून त्यांनी दोघी ज्या बारमध्ये गेल्या होत्या तिथे जाऊन सीसीटीव्ही तपासलं असता धक्का बसला. दोघीही त्या बारमध्ये आल्याच नव्हत्या. यानंतर पोलिसांचा संशय वाढला.
तपासादरम्यान पोलीस पुरावे शोधत होते. पण अखेर दोन वर्षांनी सत्य समोर आलं. पोलिसांनी शायनला ताब्यात घेतल्यानंतर सगळा उलगडा झाला.
नेमकं काय आहे ब्रिटनीच्या हत्येचं रहस्य?
ब्रिटनीने सोशल मीडियावर जो फोटो शेअर केला होता, त्यातूनच सगळा हत्येचा उलगडा झाला. पोलिसांनी हा फोटो निरखून पाहिला असता त्यात शायनने जो पट्टा घातला होता त्याचाच वापर करत शायनचा गळा दाबण्यात आला होता. पोलिसांनी कठोरपणे चौकशी केली असता शायनने आपण ब्रिटनीची कशी आणि का हत्या केली याचा उलगडा केला.
फेसबुक पोस्ट केल्याच्या सहा तासानंतर हत्या
शायनने पोलिसांना सांगितलं की, आपण दुसऱ्या एका बारमध्ये गेलो होतो. तिथे मद्यपान केल्यानंतर दोघींमध्ये एका गोष्टीवरुन मोठा वाद झाला. हा वाद इतका वाढला की बारमधून बाहेर गेल्यानंतर शायनने पट्ट्याने गळा दाबून ब्रिटनीची हत्या केली. फेसबुकला फोटो अपलोड केल्यानंतर सहा तासातच शायनने तिची हत्या केली होती. पोलिसांना आपल्यावर संशय येऊ नये यासाठी आपण शोक व्यक्त करणारी एक पोस्ट शेअर केल्याचंही तिने सांगितलं आहे.
यानंतर पोलिसांनी शायनविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तिला सात वर्षांच्या जेलची शिक्षा सुनावण्यात आली आहे.